तक्रारकर्त्यानेच केला गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर - दोन दिवसांपूर्वी वाडी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. ज्याने आपल्या घरावर गोळीबार झाला, अशी तक्रार केली होती त्यानेच गोळीबार केल्याचे तपासात स्पष्ट झाले. यातील सर्वच आरोपी गुंड असून, एकूण सात जणांना अटक करण्यात आली. तसेच दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. 

आकाश दिनेश राऊत (वय १९, रा. विजया पंडित नगर, नंदनवन आणि मयूर गुरुदेव मुरार (वय १९, दिघोरी दहनघाटजवळ, नंदनवन) हे दोघे मित्र आहेत.

नागपूर - दोन दिवसांपूर्वी वाडी येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. ज्याने आपल्या घरावर गोळीबार झाला, अशी तक्रार केली होती त्यानेच गोळीबार केल्याचे तपासात स्पष्ट झाले. यातील सर्वच आरोपी गुंड असून, एकूण सात जणांना अटक करण्यात आली. तसेच दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली. 

आकाश दिनेश राऊत (वय १९, रा. विजया पंडित नगर, नंदनवन आणि मयूर गुरुदेव मुरार (वय १९, दिघोरी दहनघाटजवळ, नंदनवन) हे दोघे मित्र आहेत.

त्यांचे गुन्हेगारीचे कार्यक्षेत्र वाडी आहे. दोघांचा मित्र बादल रामटेके वाडीतील शिवाजीनगरात राहतो. १६ जानेवारीला मयूर आणि आकाश बादलला भेटायला वाडीत गेले होते. बादलसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यामुळे बादलने दोघांचीही धुलाई केली. त्यामुळे मयूर आणि आकाशने तेथून पळ काढला. मात्र, मार खाल्ल्याने गुन्हेगारी जगतात बदनामी झाल्याची खंत त्या दोघांना होती. त्यामुळे त्यांनी बादलचा ‘गेम’ करण्याचा प्लान केला. मयूर आणि आकाश हल्ला करणार असल्याची टीप बादलला मिळाली. तोही टोळीसह घरात दडून बसला होता. 

२० जानेवारीला मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आकाश, निकेश कमलेश ठाकरे (विजया पंडित नगर) आणि १७ वर्षे वयोगटातील पाच मुले बादलला मारण्यासाठी दुचाकीने वाडीत गेली. मात्र बादल व भारत सहारे यांनीच गोळीबार करून त्यांना पिटाळून लावले. प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून त्यांनीच तक्रार करून आपल्यावर गोळीबार झाल्याची तक्रार केली. 

भारत सहारेच्या टीमचा सामना
बादलने वाडीतील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (३२, रा. शिवाजीनगर, कंट्रोल वाडी) याला बोलावून घेतले. सतीश कुलदीप सहारे, सचिन कुलदीप सहारे, राहुल गणेश कडुसले, जीवन दिलीप मोहिते आणि अन्य १५ युवकांच्या टीमसह बादलला मदत करण्यासाठी सज्ज होता. आकाश सात ते आठ मुलांसह वाडीत आला. त्याने सहारेच्या मामाच्या कारच्या काचा फोडल्या. त्यानंतर दबा धरून बसलेल्या सहारेच्या टोळीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यामुळे घाबरलेल्या आकाशने मुलांसह पळ काढला. मात्र, भारत सहारेने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. यात एक गोळी मयूरच्या पायाच्या पोटरीतून आरपार गेली.

सीसीटीव्हीचे फुटेज गायब
भारत सहारे याच्यावर आतापर्यंत १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. खरबीतील टोळीवर स्वतःच हल्ला करून गोळीबार केला. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. लगेच लोकांची गर्दी जमली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. मात्र, पोलिस आल्यावर सीसीटीव्ही फुटेजवरून आपल्याला अटक करतील, या भीतीपोटी सहारेने सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्डरमधील रेकॉर्डिंग गायब केले.

स्वतःचा काढून दिल्या गोळ्या
सहारेने पोलिसांना कॉल करून घटनास्थळावर बोलावले. गुंडांनी माझ्यावर गोळीबार केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. मात्र, घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना बुलेट केस मिळून आल्या नाहीत. त्यामुळे भारत सहारेनेच दोन बुलेट केस आणि दोन बुलेट आणून दिल्या. त्यामुळे पोलिसांना घटनेबाबत संशय आला. तक्रारदारानेच असे कृत्य केल्याने पोलिसांनी उलट दिशेनेही तपास केला. या प्रकरणात वाडी पोलिस ठाण्यातून निलंबित झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका संशयास्पद आहे.

Web Title: nagpur news firing