कामठीत वेकोलि कर्मचाऱ्यावर गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कन्हान  - कामठी येथील जगदीश श्रावणकर सकाळी सहा वाजता वेकोलि कामठी कॉलरी खुली खदान येथे दुचाकीने कामावर जाताना कांद्री बसस्थानकाजवळ मागाहून दोन अज्ञात व्यक्‍तींनी बंदुकीने गोळीबार करून जखमी केले. त्यानंतर ते मनसरच्या दिशेने पळून गेले. जखमी श्रावणकर यांना दवाखान्यात नेले. तेथे उपचाराची व्यवस्था नसल्याने कामठी व पुढे प्रकृती गंभीर असल्याने मेयो रुग्णालयात दखल करण्यात आले.

कन्हान  - कामठी येथील जगदीश श्रावणकर सकाळी सहा वाजता वेकोलि कामठी कॉलरी खुली खदान येथे दुचाकीने कामावर जाताना कांद्री बसस्थानकाजवळ मागाहून दोन अज्ञात व्यक्‍तींनी बंदुकीने गोळीबार करून जखमी केले. त्यानंतर ते मनसरच्या दिशेने पळून गेले. जखमी श्रावणकर यांना दवाखान्यात नेले. तेथे उपचाराची व्यवस्था नसल्याने कामठी व पुढे प्रकृती गंभीर असल्याने मेयो रुग्णालयात दखल करण्यात आले.

वेकोलि कामठी कॉलरी खुली खदान येथे डिझेल पंपावर कार्यरत जगदीश शालिकराव श्रावणकर (वय ४९, मच्छीपूल, राममंदिर, कामठी) हे सकाळी सहाच्या दरम्यान दुचाकीने कामठी खुली खदान येथे कामावर जायला निघाले. यावेळी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कांद्री बसस्थानकाजवळ मागाहून येत असलेल्या दोन अज्ञात व्यक्‍तींनी अचानक बंदुकीने गोळीबार केला.

थोडे पुढे जाऊन दुसरी, तिसरी गोळी मारली. यावेळी घाईगडबडीत हातातून बंदूक खाली पडली. आरोपींचा तोल गेल्याने ते दुचाकीसह खाली पडले. जीव वाचविण्यासाठी गंभीर जखमी जगदीशने आपली दुचाकी वळवून कांद्री गावातील नवदुर्गा मंडळाजवळ पोहोचून वाचविण्याची विनंती केली. यावेळी काही व्यक्‍तींनी त्वरेने वेकोलिच्या जे. एन. दवाखान्यात नेले. येथे उपचाराची योग्य व्यवस्था नसल्याने कामठी येथील आशा व रॉय खासगी रुग्णालयात नेले. परंतु, गोळी कमरेच्या आत असल्याने प्रकृती गंभीर, चिंताजनक पाहून तेथेही न घेतल्याने मेयो रुग्णालयात नागपूरला नेऊन उपचारार्थ दाखल करण्यात आले. 

जगदीश श्रावणकर हे वेकोलि कोळसा खाणीमध्ये डिझेल पंपावर कार्यरत आहेत. या कोळसा खाणीत कोळसा, लोखंड, डिझेल, तांब्याची तारचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याने डिझेलच्या प्रकरणातूनसुद्धा आरोपींनी गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असावा, अशी नागरिकांत चर्चा होती.

पोलिस प्रशासनासमोर आव्हान         
कन्हान शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सुरू होऊनसुद्धा परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शांतता व सुव्यवस्था कायम नसल्याने सर्वसामान्यांत भीतीचे वातावरण आहे. ठाणेदार गायकवाड यांच्या वादग्रस्त कार्यप्रणालीमुळे कन्हान पोलिस ठाण्याच्या परिसरात तीनदा मोठ्या प्रमाणात दरोडा व गोळीबाराच्या गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र, पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी गायकवाड यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. कन्हानजवळ वेकोलिच्या तीन खुल्या कोळसा खाणी असून येथे अपघात होत असल्याने वेकोलिच्या कर्मचाऱ्यांकरिता ५० बेडचा कांद्री येथे दवाखाना उभारण्यात आला. परंतु, वेकोलि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वेकोलिच्या या दवाखान्यात कर्मचाऱ्यांवरही वेळेवर उपचार होऊ शकत नसल्याने वेकोलिचा हा दवाखाना पांढरा हत्ती झाला आहे.

Web Title: nagpur news Firing on the worker Vekuli employee