माजी राज्यमंत्री ऍड. मधुकर किंमतकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

नागपूर - विदर्भाच्या अनुशेषाचे गाढे अभ्यासक, कॉंग्रेसचे नेते तसेच माजी अर्थराज्यमंत्री ऍड. मधुकर ऊर्फ मामा किंमतकर यांचे बुधवारी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. उद्या गुरुवारी (ता.4) रामटेक मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फुफ्फुसाचा त्रास असल्याने त्यांना धंतोली येथील गेटवेल इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मावळली. 

ऍड. मधुकर किंमतकर यांचा जन्म 10 ऑगस्ट 1932 साली रामटेक येथे झाला. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर उच्चशिक्षणासाठी ते नागपूरला आले. एलएलबीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हाताखाली वकिली सुरू केली. कॉंग्रेसचे नेते नरेंद्र तिडके यांनी सुरू केलेल्या मॉडेल मिलच्या कामगाराच्या चळवळीत ते उतरले. येथूनच त्यांची राजकीय कारर्कीद सुरू झाली. 1980 साली कॉंग्रेसने त्यांना रामटेक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. पहिल्याच निवडणुकीत ते विजयी झाले. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात ते राज्यमंत्रीसुद्धा होते. सहा वर्षे विधान परिषदेचेही सदस्य होते. विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ते आग्रही होते. राज्य शासनाने त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदीसुद्धा नियुक्ती केली होती. राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरही त्यांचा अभ्यास बघून विदर्भ वैधानिक विकास मंडळावर तज्ञ सदस्य म्हणून नियुक्त केले. 

Web Title: nagpur news Former Congress minister Madhukar Kimmatkar passes away