विद्यार्थिनींना वर्षभर निःशुल्क सॅनिटरी नॅपकिन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

नागपूर - महापालिका व रोटरी क्‍लब पुढील वर्षभर महापालिका शाळातील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या अभियानाला महापौर नंदा जिचकार यांनी सुरुवात केली. सुरू शैक्षणिक वर्षात 23 मार्चपर्यंत सॅनिटरी नॅपकीनचे विविध शाळांत वितरण करण्यात येणार आहे. 

नागपूर - महापालिका व रोटरी क्‍लब पुढील वर्षभर महापालिका शाळातील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या अभियानाला महापौर नंदा जिचकार यांनी सुरुवात केली. सुरू शैक्षणिक वर्षात 23 मार्चपर्यंत सॅनिटरी नॅपकीनचे विविध शाळांत वितरण करण्यात येणार आहे. 

महानगरपालिका व रोटरी क्‍लबच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. महापौर नंदा जिचकार यांनी गांधीनगर येथील वाल्मीकीनगर शाळेतील विद्यार्थिनींना निःशुल्क सॅनिटरी नॅपकिनचे वितरण केले. या वेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेविका ऋतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, रोटरी क्‍लबच्या वर्षा जावंदिया, रमिला मेहता, मेघना खेमका, डॉ. चारू बाहेती, मधुबाला सारडा, नरेश जैन, पीयूष फतेपुरिया, प्रमोद जावंदिया प्रामुख्याने उपस्थित होते. मनपा शाळेतील विद्यार्थिनी गरीब घरातील असून त्यांना सॅनिटरी नॅपकिनचे महत्त्व कळणे गरजेचे असल्याचे महापौर म्हणाल्या. याबाबत पालकांनी जागरूक राहणेही महत्त्वाचे आहे. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. त्याबाबत कोणतीही भीती मनात बाळगू नये, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. संचालन कमला मंगवानी यांनी केले. आभार रजनी परिहार यांनी मानले. 

हनुमाननगर, धंतोली झोनमध्ये आज वितरण 
23 मार्चपर्यंत झोननिहाय सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात येणार आहे. आज, 20 मार्च रोजी हनुमाननगर व धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या शाळेतील विद्यार्थिनींना दुर्गानगर माध्यमिक शाळेत, 21 मार्च रोजी नेहरूनगर व गांधीबाग झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थिनींना पन्नालाल देवडिया हिंदी माध्यमिक शाळेत, 22 मार्चला सतरंजीपुरा व लकडगंज झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थिनींना संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा येथे तर 23 मार्चला आसीनगर आणि मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या शाळांतील विद्यार्थिनींना एम. ए. के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेत सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात येणार आहे. 

Web Title: nagpur news Free sanitary napkins for girls all year round