गणेशोत्सवात चांदीला आली सोन्याची झळाळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नागपूर - गणेशोत्सवात पूजेचे साहित्य आणि मूर्तीला चांदीचे अलंकार वाहण्याची क्रेझ आता झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे सराफा व्यवसायात चांदीच्या विक्रीत तिप्पट ते चौपट वाढ होऊ लागली आहे. वाढलेल्या मागणीमुळे चांदीच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने चांदीला गणेशोत्सवात सोन्याची झळाळी आली आहे.

नागपूर - गणेशोत्सवात पूजेचे साहित्य आणि मूर्तीला चांदीचे अलंकार वाहण्याची क्रेझ आता झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे सराफा व्यवसायात चांदीच्या विक्रीत तिप्पट ते चौपट वाढ होऊ लागली आहे. वाढलेल्या मागणीमुळे चांदीच्या व्यवसायात कोट्यवधींची उलाढाल होऊ लागली आहे. यामुळे खऱ्या अर्थाने चांदीला गणेशोत्सवात सोन्याची झळाळी आली आहे.

शहर आणि परिसरातील लहान-मोठी सुमारे बाराशे मोठी मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. त्यातील दीडशेहून अधिक मंडळांच्या मूर्ती चांदीच्या विविध अलंकारांनी आभूषित आहेत. त्यात आभूषणात वाढ करण्याची परंपरा कायम असून नवीन मंडळेही आता चांदीचे दागिने खरेदी करण्यावर भर देत आहे. काही नागरिक नवसाला पावणारा गणपती म्हणून आपली इच्छा पूर्ण झाल्याने चांदीचे दागिने देण्याचे प्रमाणही वाढत आहेत. त्यात चांदीचे मुकुट, बाजूबंद, पावलांसह इतरही साहित्यांचा समावेश आहे. काही मूर्तींवर सरासरी किमान पंधरा ते वीस किलोचे अलंकार आहेत आणि प्रत्येक वर्षी मंडळांकडे भाविकांकडून किमान अर्धा ते पाऊण किलो चांदीचे दागिने अर्पण होतात. उर्वरित बहुतांश सार्वजनिक मंडळांकडेही शंभर ते तीनशे ग्रॅम चांदीचे अलंकार भाविकांतून अर्पण होतात. जिल्ह्यातील मोठ्या मंडळांची संख्या किमान तीन हजारांवर आहे. 

शहरात कुटुंबांची संख्या पाच ते साडेपाच लाखांवर आहे. त्या यातील एकूण कुटुंबांपैकी किमान चाळीस ते पंचेचाळीस टक्के कुटुंबांत गणेशमूर्ती प्रतिष्ठापना होते. 

सजावटीचेही विविध साहित्य
कंठ्या, कड्या, तोडे, दूर्वा, दूर्वाहार, सुपारी, नारळ, अक्षता, चांदीचे दागिने, केवडा, मोदक, शंख, ताम्हन, ताट, विविध प्रकारची फळे, ड्रायफ्रूट्‌स, लाडू, उंदीर, सोंडपट्टी, त्रिशूल, डमरू, विविध प्रकारच्या माळा आदी गणपतीच्या अलंकारांबरोबरच चांदीच्‍या सजावटीच्‍या विविध साहित्याची विक्री होते, असे रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले.

चांदीच्या ताटांची विक्री
विदर्भात गौरीगणपतीचे विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने माहेरवासीनी आलेल्या गौरीला चांदीच्या ताटात जेवण देण्याची प्रथाही वाढत आहे. गेल्या काही वर्षात चांदीच्या ताटांची विक्री वाढली आहे. दहा ग्रॅमपासून ते सव्वा ते दीड किलोपर्यंतच वजनाचे चांदीचे दागिने आणि ताट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Web Title: nagpur news ganeshotsav silver