जीएम बियाणे विकणाऱ्य़ा पाच बिय़ाणे कंपन्या विरोधात नागपूरात एफआयआर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पंतप्रधान कार्यालयाने कापूस उत्पादकांना जेनेटिकली माँडिफाईड बियाणे विकून होणाऱ्या लुटी संदर्भात दखल घेतली होती. यानंतर केंद्र सरकारने जेनेटिकली माँडिफाईड पद्धतीने लागवड होणाऱ्या कापसासंदर्भात एका आढावा बैठक आयोजीत केली होती. यात जवळपास आठ राज्यात ३५ लाख अशा प्रकारे कापसाचे जीएम बियाणे अवैधपणे विकल्याच पुढे आल होत

नागपूर - देशात मान्यता नसतांना राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना herbicide tolerant या तंत्रज्ञानावर आधारीत जीएम बियाणे विकल्याप्रकरणी राज्याच्या कृषी आयुक्तांनी पाच बियाणे कंपन्यांवर नागपूरात एफआयआर दाखल केला. बाळभद्र, जादु, एटीएम, क्रिष्णा गोल्ड आणि अर्जुन अशा या बियाणे कंपन्यांची नावे आहेत.
 
पंतप्रधान कार्यालयाने कापूस उत्पादकांना जेनेटिकली माँडिफाईड बियाणे विकून होणाऱ्या लुटी संदर्भात दखल घेतली होती. यानंतर केंद्र सरकारने जेनेटिकली माँडिफाईड पद्धतीने लागवड होणाऱ्या कापसासंदर्भात एका आढावा बैठक आयोजीत केली होती. यात जवळपास आठ राज्यात ३५ लाख अशा प्रकारे कापसाचे जीएम बियाणे अवैधपणे विकल्याच पुढे आल होत. यांसदर्भात राज्याच्या कृषी आयुक्तांनी नागपूरात पाच बियाणे कंपन्यांवर एफआआर दाखल करून या कंपन्यांनी परवानगी नसतांना हे बियाणे कसे काय विकले याची चौकशी करण्याची मागणी केली आहे

Web Title: nagpur news: gm crops