गोरेवाडा जंगलाला भीषण आग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नागपूर - गोरेवाडा जंगल परिसरात गुरुवारी (ता. ११) दुपारी दोन ते अडीच वाजतादरम्यान आग लागली. यामुळे सुमारे १०० हेक्‍टर परिसरातील वनसंपदा खाक झाली. महिनाभरातील ही दुसरी घटना असून, यापूर्वी १० डिसेंबर रोजी गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय परिसरात अशाच प्रकारची आग लागली होती. यामुळे घातपाताची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

गोरेवाडा वनपरिक्षेत्राचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. बोथला रस्त्यावर हिंदुस्थान लीव्हरच्या गोदामाजवळ टोल टॅक्‍सच्या डावीकडे ही आग लागली. आगीत परिसरातील गवत व अनेक झाडे जळून खाक झाली. आगीची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. विभागाची एक गाडी घटनास्थळी पोहोचली. महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाचे तीन टॅंकरदेखील घटनास्थळी पोहोचले.

महामंडळाचे ३५ कर्मचारी आणि कंत्राटदारांचे ६० कामगार आग विझविण्यासाठी झटत होते. तीन तासांनंतर जवळपास सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास आग आटोक्‍यात आली. आगीच्या कारणाबद्दल विचारले असता काळे यांनी मानवनिर्मित असल्याचे संकेत दिले.

नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक ए. झेड. राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील सोनटक्‍के व राजेंद्र उईके यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Web Title: nagpur news gorewada forest fire