संभ्रमातच उघडले शटर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

नागपूर - वस्तू व सेवा कर (जीएसटी) आजपासून देशात लागू झाला असताना शहरातील बाजारपेठेत अद्यापही अस्थिरतेचे वातावरण आहे. किराणा, सराफा, कपडा, वाहनासह सर्वच बाजार सुरळीत सुरू असून, किराणा ओळीत अद्यापही जुन्याच दराने मालाची विक्री होत आहे. घाऊक कपडा व्यापाऱ्यांकडे जीएसटी नंबरच नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. किरकोळ व्यापारावर भर असल्याने येथील घाऊक कपडा व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. 

नागपूर - वस्तू व सेवा कर (जीएसटी) आजपासून देशात लागू झाला असताना शहरातील बाजारपेठेत अद्यापही अस्थिरतेचे वातावरण आहे. किराणा, सराफा, कपडा, वाहनासह सर्वच बाजार सुरळीत सुरू असून, किराणा ओळीत अद्यापही जुन्याच दराने मालाची विक्री होत आहे. घाऊक कपडा व्यापाऱ्यांकडे जीएसटी नंबरच नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. किरकोळ व्यापारावर भर असल्याने येथील घाऊक कपडा व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. 

शनिवारपासून जीएसटी लागल्यानंतर सोन्याचे दर आणि घडणावळीवरील दर वाढणार असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी केली होती. सोन्यावर पूर्वी फक्त दीड टक्केच मुल्यवर्धित कर आकारण्यात येत होता. तो आता तीन तर घडणावळीवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे सोन्याचे दर वाढणार असल्याने शुक्रवारी सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. शनिवारी मात्र, बाजारातील गर्दी मंदावली आहे. बाजार सुरळीत सुरू असून जीएसटीसाठी व्यापारी सज्ज आहे. परंतु, ग्राहकांना जीएसटी आकारून दागिने विक्री करताना आमची थोडी अडचण होत असल्याचे सराफा व्यापारी राजेश रोकडे यांनी सांगितले. 

या मॉलमध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर उत्साहाचे वातावरण असून कमी दरात वस्तूची विक्री होत आहे. किरकोळ व्यापारी अद्यापही जुन्याच दराने वस्तूची विक्री करीत आहे. या विक्रीकर त्याला क्रेडीट मिळणार असले तरी ते अतिशय अल्प आहे. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना जुना साठा संपेपर्यंत जुन्यात दरात विक्री करावी लागणार. नव्या दरानुसार वस्तू खरेदीसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. जीएसटीनुसार व्यवसाय करणारे व्यापारीच या स्पर्धेत टिकणार असल्याने त्यांनीही नव्या कर प्रणालीने व्यवसाय करण्याचे निश्‍चित केले आहे. सरकारने वस्तूंवर आकारण्यात येणारे कर निश्‍चित केलेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासूंन व्यापाऱ्यामध्ये असलेली अनिश्‍चितता काही प्रमाणात दूर झालेली आहे. मात्र, विवरण भरण्याच्या किचकट प्रक्रियेबद्दल स्पष्टता नसल्याने ते घाबरलेले आहेत, असे नाग विदर्भ चेंबर ऑफ काँमर्सचे सचिव जयप्रकाश पारेख म्हणाले. जीएसटीनंतर दुचाकींच्या किमती कमी झाल्या आहेत. ही वाहन व्यवसायासाठी चांगले संकेत असल्याचे वाहन विक्रेते निखिल कुसुमगर यांनी सांगितले. 

काही व्यापारी एमआरपीवर जीएसटी लावून वस्तूंची विक्री करीत आहेत. हे बेकायदेशीर आहे. अशांवर गुन्हे दाखल करावे. 
- श्‍यामकांत पात्रिकर,ग्राहक पंचायत

दुचाकी स्वस्त
जीएसटीपूर्वी अनेक गाड्या महाग होणार असल्याचे सांगून ग्राहकांची दिशाभूल केली आहे. त्यांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची प्रलोभने दाखविली. ऑफर दिल्या. प्रत्यक्षात जीएसटी लागू झाल्यावर दुचाकींच्या किमती सरासरी पाचशे ते हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत. 

Web Title: nagpur news GST

टॅग्स