पतंगोत्सवावर जीएसटीची वक्रदृष्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

नागपूर - पतंगोत्सव म्हणजे तरुणाईच्या खास उत्साहाचा उत्सवच. आकाशात आपली पतंग उंच उडवत ठेवायची आणि इतरांची पतंग कापल्यावर ‘ओ काट...’ची आरोळी ठोकून पुन्हा दुसऱ्या पतंगाकडे वक्रदृष्टी टाकायची. आकाशातल्या सर्वच पतंग काटून आकाशात फक्त आपलीच पतंग दिमाखात उडवायची, अशी सर्वच पतंगबाजांची इच्छा असते. यंदा मात्र, वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि पतंगीला लागणाऱ्या कमच्या (बांबूच्या काड्या) आवक कमी असल्याने पतंग आणि मांजाचे भाव वाढल्याने पतंगबाजांचा खिसा हलका झाला आहे. 

संक्रांतीला सूर्याचे उत्तरायण सुरू होते, वारे बदलतात. त्याची मजा घेण्यासाठी असलेल्या या उत्सवात फक्त तरुणाईच नाही, तर सारे आबालवृद्ध सहभागी होतात. यामुळेच शहरातील जुनी शुक्रवारी, गणेशपेठ आणि इतवारी परिसरात पतंग खरेदीसाठी सर्वांचीच गर्दी होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरी ग्राहकांकडून त्याबद्दल वारंवार विचारणा होत असल्याने विक्रेत्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. नायलॉन मांजाची विक्री थांबविल्याने आम्हाला आनंद झाला. त्या मांजाची किंमत कमी असल्याने विक्री भरपूर होत असली तरी पक्ष्यांसह मानवालाही धोकादायक होते. यावर्षी बंदी डोकेदुखी ठरत असली तरी पुढील वर्षी हा ट्रेंड संपेल आणि पुन्हा बरेली आणि कॉटनच्या मांजाला मागणी वाढेल, असे मत पतंग विक्रेते राजेश बनोदे यांनी व्यक्त केले. 

वस्तू व सेवा करामुळे पतंगीच्या तावाचे दर वाढल्याने यंदा पतंगाच्या दरात एक ते २० रुपयांची वाढ तर मांजाच्या दरातही प्रतिरिळ २० ते ३० रुपयांची वाढ झालेली आहे.

कामगारांच्या दरात वाढ
नागपुरातील पतंग विदर्भासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात विक्रीसाठी जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या राज्यातून मागणी वाढली आहे. पतंगीसाठी लागणारा कमचीची अल्प आवक, कामगारांच्या दरात झालेली वाढ आणि जीएसटीमुळे यंदा पतंगाच्या किमती वाढल्या आहेत, असे संदीप बनोदे म्हणाले. यंदा प्रथमच अहमदाबाद येथून नागोबा आणि झालरवाल्या पतंग बाजारात आल्याचेही ते म्हणाले.  

नरेंद्र, योगी आदित्यनाथ पण देवेंद्र नाही
नागपुरात गुजरात, कोलकाता आणि दिल्ली येथून पतंगी येतात. मात्र, सर्वाधिक पतंगी नागपुरातील तांडापेठ, गांजाखेत, गोळीबार चौक, बांगलादेश या भागात वर्षभर पतंगी तयार करण्याचे काम चालते. या पतंग व्यापारी विकत घेत असतात. पतंप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पतंगीवर झळकले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेली पतंग बाजारात नाही. याशिवाय सिने नट-नट्यांसह कार्टून फिल्ममधील छोटा भीम, मिक ॲण्ड डोनाल्ड यांची चित्र असलेल्या पतंगींना बच्चे कंपनीकडून पसंती मिळत आहे.

Web Title: nagpur news GST kite festival