संसर्गजन्य आजारांचा प्रकोप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

नागपूर - महापालिकेसह मेयो, मेडिकलसह आरोग्य विभागात डेंगीच्या रुग्णांची संख्या 54 तर मलेरियाच्या रुग्णांची संख्या मलेरियाच्या दोनशेपेक्षा अधिक आहे. घरोघरी प्रत्येकाच्या साथीला ताप असून गॅस्ट्रोची साथ पूर्व नागपुरात आहे. स्वाइन फ्लूसहित साऱ्या साथीच्या आजारांनी हातात हात घालून येण्याचा इशारा दिला आहे. 

"एडिस एजिप्ती' या डेंगी प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या, मलेरिया वाहक "ऍनॉफिलीस स्टिफेन्सी' डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. ही सर्व उत्पत्तीस्थाने तत्काळ नष्ट करण्याची मोहीम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. 

डेंग्यू, मलेरियासारख्या साथ आजारांना नियंत्रणात आणण्यासाठी तसेच प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याचा धडक कार्यक्रम महापालिकेतर्फे सुरू आहे. उपराजधानीत डेंगी नियंत्रणासाठी गृहभेटाच्या मोहिमेला गती देण्यात आली असून सर्वच झोनमध्ये डास अळ्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. दोन हजारांवर डास अळ्या शहरात आढळल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. 

डेंगीने मृत्यू झालेल्या चार रुग्णांची नोंद मेडिकलमध्ये आहे. तर मेयोतही दोन जण डेंगीने दगावले आहेत. मलेरियाच्या 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. तर आरोग्य विभागात पूर्व विदर्भात 37 जण स्वाइन फ्लूने दगावले असून यापैकी 15 जणांपेक्षा जास्त रुग्ण शहरातील आहेत. डेंगी, मलेरिया, गॅस्ट्रो या साथीच्या आजाराचे थैमान पसरले असतानाही महापालिकेच्या हेल्थपोस्टमध्ये औषधांचा तुटवडा दिसून येतो. पाण्याच्या टाक्‍या, कारंजे, कूलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचवलेले पाण्याचे डबके दिसतात. बांधकाम करणाऱ्यांना मात्र नोटीस देण्यात येत नाही. 

हेल्थपोस्टमध्ये गॅस्ट्रोवर उपचार नाही 
साथ आजारांचा धोका महानगराला आहे. शहरातील मिनिमातानगर, डायमंडनगर, विश्‍वशांतीनगर, यशोधरानगर, कळमना, चिखली या भागात गॅस्ट्रोचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. नागपुरातील एकाही हेल्थपोस्टवर गॅस्ट्रोग्रस्तांसाठी सोय नाही. येथे गॅस्ट्रोग्रस्तांना औषधी मिळत नसल्याने खासगीत गर्दी असते. रुग्णांच्या घरापर्यंत फिरते पथक पोहोचण्याची गरज आहे. यासाठी कधीकाळी नागपूर महापालिकेत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला होता. परंतु, अलीकडे हा नियंत्रण कक्ष हरवला असल्याची चर्चा महापालिकेत आहे. 

आजार रुग्ण 
डेंगी - 54 
मलेरिया - 197 
स्वाइन फ्लू - 140 
गॅस्ट्रो - 422 

साथीचे दिवस आहे. अद्यापही अनेकांच्या घरी पिंप वा ड्रम कोरडे केले जात नाही. कूलर स्वच्छ केले नाही. यात डासांच्या अळ्या आढळून येतात. जागोजागी टायर्स, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी पत्रे, घरावर टाकलेले प्लॅस्टिकमध्ये पावसाचे पाणी साचलेले दिसते. डासोत्पत्ती रोखण्यासाठी निरुपयोगी वस्तू नष्ट करण्यासोबतच आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्यात यावा. 

-डॉ. मिलिंद गणवीर, सहायक संचालक, आरोग्य विभाग, नागपूर 

Web Title: nagpur news health