नवतपा आजपासून उन्हाच्या तीव्र लाटेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

नागपूर - कडाक्‍याच्या उन्हासाठी प्रसिद्ध असेलला नवतपा शुक्रवार (ता. 25) पासून सुरू होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने उन्हाच्या तीव्र लाटेचा इशारा दिल्यामुळे यंदाचा नवतपा डोक्‍याला ताप देणारा राहणार आहे. दरम्यान, अरबी समुद्रात तयार झालेले मेकुनू वादळ ओमानच्या दिशेने सरकल्यामुळे वादळाचा परिणाम विदर्भात जाणवण्याची शक्‍यता कमी आहे. 

ढगाळ वातावरणामुळे घसरलेला पारा गुरुवारी पुन्हा चढला. बुलडाण्याचा अपवाद सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचा कडाका जाणवला. नागपूरचे तापमानही दोन अंशांनी चढून 44.7 अंशांवर गेले. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद वर्धा येथे 46 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली. यवतमाळ (44.5 अंश सेल्सिअस) येथेही गेल्या चोवीस तासांत सहा अंशांची वाढ झाली. पूर्व विदर्भातील चंद्रपूर (45.7 अंश सेल्सिअस) आणि ब्रह्मपुरी (45.2 अंश सेल्सिअस) येथेही उष्णलाटेचा प्रभाव अधिक जाणवला. शुक्रवारपासून नवतपा सुरू होत असल्यामुळे तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्‍यता आहे. तसा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. पारा 47 अंशांपर्यंत जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

नवतपा म्हणजे काय? 
नवतपामध्ये सूर्य 25 मे रोजी दुपारी 2 वाजून 18 मिनिटांनी घोडा या वाहनावरून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावर नवतपाला प्रारंभ होतो. या नक्षत्रात सूर्य आणि पृथ्वी यामधील अंतर खूप कमी होते. त्यामुळे पृथ्वीवर पडणारी सूर्यकिरणे नेहमीपेक्षा अधिक उष्ण असतात. नऊ दिवसांचा नवतपा दोन जूनपर्यंत राहणार असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली. 

विदर्भात दमदार पाऊस 
ग्रहसंकेतानुसार, यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. विदर्भात 22 जूनला सकाळी 11 वाजून 08 मिनिटांनी सूर्य आर्द्रा नक्षत्रात हत्तीवरून प्रवेश करेल. त्यावेळी खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होणार आहे. पावसाळ्यात अंदाजे 55 दिवस पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. शिवाय समुद्री वादळ, त्सुनामी आणि भूकंपासारखे संकटही ओढवू शकते. 

Web Title: nagpur news heat wave warning