मेश्राम यांची सेवापुस्तिका सहसंचालकांना सोपवा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांची सेवापुस्तिका एक आठवड्याच्या आत उच्च शिक्षण सहसंचालकांकडे सोपविण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यापीठाला दिले. यासोबतच डॉ. मेश्राम यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांनाही स्थगिती देण्यात आली आहे. यावर्षी जूनमध्ये ते सेवानिवृत्त होत आहेत. 

विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. मेश्राम यांची चोवीस वर्षांपूर्वी नियुक्ती झाली होती. सहा वर्षांनी त्यांना उपकुलसचिव म्हणून पदोन्नती देण्यात आली. तोपर्यंत त्यांना शिक्षकपदाचीच वेतनश्रेणी देण्यात आली. 2009 मध्ये वित्त व लेखा अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. प्राध्यापकपदाची वेतनश्रेणी मात्र देण्यात आली नाही. मेश्राम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर आदेशांप्रमाणे वेतनश्रेणी लागू झाली. दरम्यान, 30 मे 2014 ला मेश्राम यांची वित्त व लेखा अधिकारी पदावर पुनर्नियुक्ती करण्यात आली. परंतु, राज्यपालांनी प्रस्ताव अमान्य केला. त्यामुळे मेश्राम यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. सर्वोच्च न्यायालयातही विद्यापीठाच्या पदरी निराशाच आली. त्यानंतर मेश्राम यांच्या वेतननिश्‍चितीचा प्रस्ताव उच्च शिक्षण सहसंचालकांकडे पाठविण्यात आला. सहसंचालक अंजली रहाटगावकर यांनी विद्यापीठात प्रशासनावर दबाव आणून मान्यता मिळविली जाते, पुरण मेश्राम यांचे वेतननिश्‍चिती प्रकरण त्याचे उत्तम उदाहरण आहे, असा शेरा दिला. 

त्यानंतर मेश्राम यांनी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात सुनील मिश्रा यांनी मध्यस्थी करून मेश्राम यांना प्राध्यापकाची वेतनश्रेणी लागू करण्यास विरोध केला. तसेच मेश्राम यांच्याकडे लाखो रुपयांची थकबाकी असून ती वसूल करण्याची विनंती केली. दरम्यान, न्यायालयाने मेश्राम यांनी सहसंचालकांकडे सेवा पुस्तिका सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप त्यांनी सेवापुस्तिका सादर केलेली नाही. आज त्यांची सेवापुस्तिका सहसंचालकांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. 

Web Title: nagpur news high court Dr. Puranchandra Meshram