उपराजधानीत पारा उच्चांकीवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नागपूर - विदर्भात तापमानाचा भडका पुन्हा उडाला असून, अनेक शहरांमध्ये पारा चाळिशीच्या उंबरठ्यावर आहे. नागपुरात कमाल तापमानाने बुधवारी मोसमातील 39.1 अंशांचा नवा उच्चांक गाठला आहे. या आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्‍यता प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

उत्तर भारताकडून विदर्भाच्या दिशेने कोरडे वारे वाहात असल्यामुळे ढगाळ वातावरणासोबतच ऊनही तापत आहे. परिणामत: गेल्या चोवीस तासांत विदर्भातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंशांची लक्षणीय वाढ झाली. बुधवारी विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी (39.7 अंश सेल्सिअस) येथे करण्यात आली. उपराजधानीतही पाऱ्याने 39.1 अश सेल्सिअस हा मोसमातील नवा उच्चांक गाठला. याआधी 14 मार्चला नागपूरचे कमाल तापमान 38.8 अंशांवर गेले होते. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि अकोला येथेही पाऱ्याची चाळिशीकडे वाटचाल सुरू आहे. 

उन्हाच्या काहिलीने चिडचिड व अस्वस्थता वाढली असून, दुपारच्या सुमारास अंगातून घामाच्या धारा निघताहेत. उन्हामुळे हळूहळू एसी आणि कुलरही बाहेर पडू लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कडक उन्हाचे यापूर्वीच संकेत दिलेले आहेत. 

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 
शहर तापमान 

ब्रह्मपुरी 39.7 
वर्धा 39.5 
चंद्रपूर 39.4 
नागपूर 39.1 
गडचिरोली 39.0 
अकोला 38.4 
वाशीम 38.0 
यवतमाळ 38.0 
अमरावती 37.8 
गोंदिया 37.0 
बुलडाणा 35.5 

Web Title: nagpur news high temperature vidarbha