सफाई कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नागपूर - समाजातील लोकांचा खाकी वर्दीतील पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमीच संशयास्पद असतो. परंतु, या खाकी वर्दीच्या भरवशावरच आजही सामान्य माणूस सुरक्षित आहे हेदेखील तो विसरता नाही. खाकी वर्दीतील पोलिसांच्या आयुष्याला चिकटलेल्या "बंदोबस्ता'ची, साऱ्यांकडे संशयाने बघण्याच्या पोलिसांच्या नजरेचीही सामान्य माणसालाही जाणीव आहे. ही जाणीव लक्षात ठेवत सुपरमध्ये तपासणीसाठी आलेले पोलिसाचे राहून गेलेले 35 हजार रुपये किमतीचे घड्याळ सफाई कामगार महिलेने प्रामाणिकपणे डॉक्‍टरांकरवी अधिष्ठातांच्या सुपूर्द केले. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घडलेली ही सत्यघटना. काही दिवसांपूर्वी सुपर स्पेशालिटीत पोलिसांची आरोग्य तपासणी झाली. या तपासणीसाठी पोलिस उपायुक्त नीलेश भरणे हेदेखील आले होते. तपासणीनंतर भरणे यांचे घड्याळ येथे राहून गेले. त्याकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष केले. कोणाच्याही ही घटना ध्यानीमनी नव्हती. भरणे यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांना यासंदर्भात सूचना दिली. रुग्णांची प्रचंड गर्दी सुपरमध्ये असते. यामुळे हरवलेले घड्याळ मिळणे अशक्‍य आहे असे थेट अधिष्ठातांनी सांगून दिले. मात्र यासंदर्भात मेडिकलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य अभियानाचे समन्वयक डॉ. मुरारी सिंग यांना अधिष्ठातांनी सूचना दिली. ते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. ज्या सोनोग्राफी विभागात "सफाई कर्मचारी' म्हणून सेवा देत असलेल्या चतुर्थश्रेणी महिलेने घड्याळ आढळल्यानंतर लगेच डॉक्‍टरकडे सुपूर्द केले होते. पोलिस दलातील त्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे घड्याळ परत करून अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय आज येथे आला आहे. या महिलेने हे घड्याळ डॉ. खेतान यांच्याकडे दिले होते. तर डॉ. खेतान यांनी डॉ. मुरारी सिंग यांच्याकडे दिले. डॉ. सिंग यांनी अधिष्ठातांच्या हातावर घड्याळ ठेवताच तेदेखील अवाक झाले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे संशयाने बघितले जाते, मात्र प्रत्येकाला संशयाने पाहणे योग्य नाही, ही शिकवण सफाई कामगार महिलेने साऱ्यांनाच दिली. अधिष्ठातांनी घड्याळ सापडल्याची माहिती पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांना दिली. 

मेडिकल असो की सुपर. येथे मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. यामुळे हरवलेली वस्तू सापडणे कठीण आहे. घड्याळ तशी लहान वस्तू आहे. यामुळे घड्याळ सापडणे अशक्‍यच होते. मात्र, आमच्या कर्मचाऱ्याला ही वस्तू सापडली. त्यांनी ती परत केली. त्यांच्या या माणुसकीला सलाम. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता. मेडिकल. 

Web Title: nagpur news honesty of the cleaning staff woman