हॉटेल हॅरिटेजच्या एचओबीवर छापा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

नागपूर - सिव्हिल लाइन्स येथील हॉटेल हॅरिटेजच्या पाचव्या माळ्यावर असलेल्या हाउस ऑफ बिअर (एचओबी) नावाच्या रेस्टॉरंटवर रविवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. या वेळी हॉटेल व्यवस्थापक मोहनीश सुनील साहनीला (२९, रा. सुंदरजीवन अपार्टमेंट, कडबी चौक) अटक करण्यात आली. हॅरिटेज हॉटेलचा मालक खंडूजाविरुद्धही गुन्हा नोंदविला असून, अद्याप अटक झालेली नाही.

रेस्टॉरंटच्या नावावर येथे हुक्का पार्लर चालत असल्याची माहिती झोन क्र. २ चे उपायुक्त राकेश ओला यांना मिळाली. मात्र, कारवाईत हुक्‍क्‍यासह ग्राहकांना दारूचाही पुरवठा करण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळले. यानंतर पोलिसांनी हॉटेलची झडती घेऊन मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या जप्त केल्या. हा माल जवळपास पाच लाखांचा असल्याची माहिती आहे. महामार्गापासून ५०० मीटर अंतरापर्यंत दारूवर प्रतिबंध असतानाही येथे सर्रास ग्राहकांना दारूचा पुरवठा करण्यात येत होता. याबाबत उपायुक्त ओला यांना माहिती मिळताच सदरचे पीएसआय विनोद मातरे आणि रीडर पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वात संयुक्त पथक तयार केले. या पथकात सदरसह गिट्टीखदान आणि सीताबर्डी ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सामील केले. रात्री ११ वाजताच्या सुमारास पोलिस पथकाने हॉटेलवर धाड टाकली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे यापूर्वीही येथील हुक्का पार्लरविरोधात कारवाई केली होती.

खोलीत मद्यसाठा
ग्राहकांना हुक्‍क्‍यासह दारूचे सेवन करताना पाहून पोलिसांनी व्यवस्थापक साहनीला सोबत घेऊन हॉटेलची झडती घेतली. झडतीत तिसऱ्या माळ्यावरील खोली क्र. २०७ मध्ये पोलिसांना देशी आणि विदेशी दारूच्या १२३ बाटल्या आढळल्या. यासोबतच बिअरच्या ११५५ बाटल्याही सापडल्या. पोलिसांनी हुक्का पॉट, फ्लेव्हर, दारू, सिगारेट जप्त केले. हॉटेल मालिक खंडूजा आणि साहनी यांच्याविरोधात दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: nagpur news hotel heritage