सायन्सचा आनंद जवादे टॉपर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मंगळवारी (ता.३०) जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात डॉ. आंबेडकर महाविद्यालयातील विज्ञान शाखेच्या आनंद जवादे याने ९८.१५ टक्‍क्‍यांसह प्रथम स्थान मिळविले. यापाठोपाठ सेंट पॉल शाळेतील अस्मिता मस्के हिने ९८ टक्के गुणासह शहरातून दुसरे स्थान, वाणिज्य शाखेत कमला नेहरू महाविद्यालयाच्या अंजली शाहने ९६.७६ टक्‍के, कला शाखेत लेडी अमृताबाई डागा महाविद्यालयाच्या (एलएडी) जुही सगदेवने ९४.७६ टक्के, तर एमसीव्हीसी शाखेतून कमला नेहरू महाविद्यालयातील अश्‍विनी पराळे हिने ७९.६० टक्‍क्‍यासह प्रथम क्रमांक मिळविला. 

डॉ. आंबेडकर महाविद्यालयातून दुर्गेश अग्रवाल आणि सेंट पॉल शाळेच्या तन्मय शेंडेने ९७.२३ टक्‍क्‍यासह संयुक्तरीत्या तिसरे स्थान मिळविले. 

वाणिज्य शाखेत डॉ. आंबेडकर  महाविद्यालयातील ऋषी काकडे याने ९५.५ टक्के गुण मिळवित दुसरे, तर शिवानी पारधी हिने ९३.८५ टक्‍के गुण घेत तिसरे स्थान मिळविले. कला शाखेत दुसऱ्या स्थानावर हिस्लॉप कॉलेजच्या अनिष बन्सोड याने ९२.७६ टक्‍क्‍यासह दुसरे स्थान मिळविले. तो मागासवर्गीयातून प्रथम आहे. एलएडी महाविद्यालयातील नंदिनी सोहनी हिने ९२.३० टक्के गुण मिळवित तिसरे स्थान मिळविले. एमसीव्हीसीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या कमला नेहरू महाविद्यालयातील रागिणी राऊतने ७८.९२ टक्के गुण मिळविले. 

रात्रशाळेतून पंजाबराव देशमुख नाईट हायस्कूलच्या मिथून दामोदरने आणि प्रशांत पारडीकर यांनी ७८ टक्‍क्‍यासह संयुक्तरीत्या प्रथम स्थान मिळविले. 

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांमधून कामठीच्या एम. एम. रब्बानी स्कूलमधील मोहम्मद अमन फजलने ८९.५० टक्के गुण मिळवित प्रथम  क्रमांक मिळविला. अंध विद्यार्थ्यांमधून हिस्लॉप महाविद्यालयातील शुभम नंदेश्‍वरने कला शाखेत ८१ टक्के गुण तर दिव्यांगातून होम फॉर एजेड शाळेतील लक्ष्मी ब्राह्मणवाडे हिने ८२ टक्‍क्‍यांसह प्रथमस्थान मिळविले.

Web Title: nagpur news hsc result