हितेश बोपचेचे नेत्रदीपक यश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - खडतर परिस्थितीचा सामना करीत मूकबधिर हितेश बोपचेने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ७२ टक्के गुणांसह नेत्रदीपक यश संपादित केले. 

नागपूर - खडतर परिस्थितीचा सामना करीत मूकबधिर हितेश बोपचेने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ७२ टक्के गुणांसह नेत्रदीपक यश संपादित केले. 

हडस कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम (एचएससीव्हीसी) चा विद्यार्थी हितेश बोपचे हा मूकबधिर आहे. घरची परिस्थितीही हलाखीची. वडील जागेश्‍वर बोपचे इलेक्‍ट्रिशियन असून, खासगी काम करून संसाराचा गाडा रेटतात. हितेशही त्यांना कामात साथ देतो. वडिलांना सहकार्य करण्याच्या भावनेने त्याने व्यावसायिक अभ्यासक्रमाची निवड केली. प्रसंगी तो वडिलांना व्यवसायात मदत करतो. परिस्थितीचा धैर्याने सामना करीत स्वप्नपूर्तीच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. शक्‍य होईल त्यावेळी अभ्यास करून त्याने ६५० पैकी ४६६ गुण मिळवून यशाचा पल्ला गाठला. त्याने आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य कुंडले तसेच गोरे, भोयर या शिक्षकांसह आईवडिलांना दिले आहे.

Web Title: nagpur news hsc result hitesh bop

टॅग्स