दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - जन्मतःच नशिबी दीड पायावरचं जगणं आलं. दुसरा पाय दिसतच नाही.  कॅलिपर शिवाय उभचं राहता येत नाही. उंचीही कमीच. एक हातही काहीसा अधू. तरीही आयुष्यात ती कधी डगमगली नाही. होम फॉर एजेड ॲण्ड हॅण्डिकॅप्ड अनाथालयात राहून तिने इंग्रजी माध्यमात वाणिज्य शाखेतून ८२ टक्के गुण मिळवले. नाव लक्ष्मी विजय ब्राह्मणवाडे. उमरेड मार्गावरील श्री बिंझाणी सीटी कॉलेजमधून तिने बारावीची परीक्षा दिली.

वर्धा जिल्ह्यातील लहानशा खेड्यातील लक्ष्मीचा एका तपापासून होम फॉर एजेड अनाथालय सांभाळ करीत आहे. तिच्या आईवडिलांची परिस्थिती तशी बेताचीच. शेतमजुरी करणारं कुटुंब. ‘पहिली बेटी, धनाची पेटी’ म्हणून नाव ‘लक्ष्मी’ ठेवले. परंतु, या कन्येला जगविण्यासाठी कुटुंबाजवळ लक्ष्मीच नव्हती. ब्राह्मणवाडे कुटुंब मानसिक दडपणाखाली जगत होते. कोणीतरी या अनाथालयाचे नाव सांगितले. १२ वर्षांपूर्वी लक्ष्मीला होम फॉर एजेड ॲण्ड हॅण्डिकॅप्ड अनाथालयात आणले. लहानपणी हाडा मांसाचा गोळा होती ती. वस्तूप्रमाणे जिथे ठेवाल तिथे राहायची. या अनाथालयात भौतिकोपचारातून आधाराने बसू लागली. पुढे चालू लागली.

आठवीपर्यंत तिला उभं राहता येत नव्हतं. परंतु, अपंग लक्ष्मीच्या जीवनाला शारीरिक आणि शैक्षणिक आधार देण्याचं मोलाचं सत्कर्म या अनाथालयानं केलं. लक्ष्मीने पदरी मिळालेलं अपंगत्व आनंदाने स्वीकारलं. दीडपाय असल्याचा न्यूनगंड न बाळगता अतूट इच्छाशक्तीच्या बळावर दहावीत ८० टक्के व बारावीत ८२ गुण मिळवून चार चाँद लावले आहेत.

यश असामान्य
परिस्थितीने नाडलेल्या कुटुंबीयांना धीर देत िसस्टर अन्सीना फ्राँन्सिस तसेच इतरही िसस्टर लक्ष्मीच्या पाठीशी उभे राहिले. इंग्रजी शिकविण्यासाठी विशेष वर्ग िसस्टर अन्सीना यांनी घेतले. यामुळेच सामान्य मुलांनी मिळवलेल्या यशाच्या तुलनेत लक्ष्मीने मिळवलेले यश असामान्य आहे.

Web Title: nagpur news hsc result laxmi brahmanwade

टॅग्स