व्यावसायिक अभ्यासक्रमांना ‘अच्छे दिन’!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

नागपूर - राज्यासह नागपूर विभागाच्या निकालात यंदा वाढ झाली. गतवर्षीपेक्षा झालेली वाढ यंदा पारंपरिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील रिक्त जागांसाठी थोडीफार फायदेशीर ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कला शाखा वगळता वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रवेशासाठी गर्दी बघायला मिळणार आहे. दुसरीकडे अभियांत्रिकी शाखेतील रिक्त जागा कमी होण्याची  शक्‍यता आहे.

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाला तीन ते चार वर्षांत अवकळा आली. अभियांत्रिकी, पॉलिटेक्‍निक, एमबीए, बीसीए, बीबीए, बीसीसीए, फार्मसीसारख्या अभ्यासक्रमात किमान ३० टक्के जागा रिक्त असल्याचे चित्र होते. त्यातच अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमांची स्थिती दयनीय होती. गेल्यावर्षी अभियांत्रिकीमध्ये राज्यातील निम्म्या जागा रिक्त होत्या. पॉलिटेक्‍निकमध्ये जवळपास तिच स्थिती होती. यावर्षी निकालात वाढ झाली असून, टक्केवारी ८९.०५ एवढी आहे.

यात विज्ञान शाखेचा निकाल ९६.१० टक्के लागला. त्यात ६६ हजार ३४४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. वाणिज्य शाखेत २० हजार ८८५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. त्याची टक्केवारी ८९.८९ आहे. तसेच एमसीव्हीसी शाखेत ७ हजार १६२ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ जास्त असल्याने यावर्षीची रिक्त जागांची संख्या कमी राहण्याची चिन्हे आहेत.

Web Title: nagpur news hsc result Professional courses