नोकरीवर संकट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

नागपूर - ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्‍निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) "मॉडेल करिकुलम' लागू करण्याचे निर्देश राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिले आहे. त्यानुसार 20 विद्यार्थ्यांच्या मागे एकाच प्राध्यापकाची नियुक्ती करता येणार असल्याने देशातील एक लाख प्राध्यापकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. 

नागपूर - ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्‍निकल एज्युकेशनच्या (एआयसीटीई) "मॉडेल करिकुलम' लागू करण्याचे निर्देश राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिले आहे. त्यानुसार 20 विद्यार्थ्यांच्या मागे एकाच प्राध्यापकाची नियुक्ती करता येणार असल्याने देशातील एक लाख प्राध्यापकांच्या नोकरीवर संकट निर्माण झाले आहे. 

अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. काही संस्थांनी तर कॉलेजच बंद करण्याचा निर्णय घेतला. शासन वारंवार गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करीत आहे. शिवाय "एआयसीटीई'द्वारे नव्या निकष तयार करण्यावर भर आहे. विशेष म्हणजे यापूर्वी महाविद्यालयात 15-1 यानुसार प्राध्यापकांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार एका महाविद्यालयामध्ये किमान 52 प्राध्यापकांचा समावेश केल्या जात होता. मात्र, आता एआयसीटीईने आता यामध्ये 20-1 असा बदल केल्याने जवळपास एक लाख प्राध्यापक कमी होणार असल्याचे दिसते. हे मॉडेल अनेक विद्यापीठांनी हे लागू केलेले नाही. मात्र, महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमाचे संदर्भ देत प्राध्यापकांची सुट्टी करणे सुरू केले आहे. शहरातील विविध महाविद्यालयांतील सुमारे 25 ते 30 प्राध्यापकांना याचा आधार घेत नोकरीतून काढले आहे. 

क्रेडिट कमी केल्याने संकट 
"मॉडेल करिकुलम'नुसार अभ्यासक्रमाला प्रॅक्‍टिकल बेस बनविण्यात आले आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणि कौशल्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. आजवर एका सेमिस्टरसाठी एआयसीटीईने क्रेडिट 200-225 (अध्यापनाचा कालावधी) निर्धारित केला होता. आता अंतर्गत क्रेडिट कमी करून 160 करण्यात आली. त्यामुळे आता अध्यापनाचा कालावधी कमी झाल्याने प्राध्यापकांची संख्याही कमी होईल. 

आधीचे विद्यार्थी- प्राध्यापक गुणोत्तर - 15:1 
आताचे विद्यार्थी- प्राध्यापक गुणोत्तर 20:1 
देशात अभियांत्रिकी महाविद्यालये - 3,334 
प्राध्यापक - 4, 47, 787 
संकटात असलेले प्राध्यापक - 1,00,000 

Web Title: nagpur news jobs issue