केजरीवालांना मनपाच्या योजनांचे आकर्षण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास पाणी, शहर बससेवेतील इथेनॉलवरील बसचेही सादरीकरण ते बघणार आहेत. शहरातील विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी भाजपचे सत्ताकेंद्र असलेले शहर निवडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपचे सत्ताकेंद्र तसेच भाजप सत्तेत असलेल्या शहरातील प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी २७ जानेवारीला नागपुरात येत आहेत. २७ व २८ असे दोन दिवस त्यांचा नागपुरातील रविभवनात तळ असून यादरम्यान महापालिकेच्या विविध प्रकल्पासह मेट्रो रेल्वे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना असलेले अजनीतील  प्रस्तावित इंटर मॉडेल स्टेशनचे सादरीकरणही ते बघणार आहेत. त्यांचा दोनदिवसीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिकेत आला असून, २७ जानेवारीला सायंकाळी त्यांचे आगमन होईल. त्यानंतर लगेच विमानतळावरील ई-चार्जिंग सेंटरला भेट देतील. येथेच ते इलेक्‍ट्रिक टॅक्‍सीचीही पाहणी करतील. त्यानंतर शहर बससेवेतील ग्रीन बसबाबत त्यांच्यापुढे सादरीकरण करण्यात येणार आहे. रात्री ते रविभवनला मुक्काम करणार असून २८ रोजी सकाळी भांडेवाडी येथील महापालिकेच्या डम्पिंग यार्डला भेट देणार आहेत. त्यानंतर संपूर्ण दिवस ते रविभवनात विविध प्रकल्पांची माहिती घेणार आहे. मनपा आयुक्त अश्‍विन मुद्‌गल शहरातील २४ बाय ७ प्रकल्पाचे तर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण त्यांच्यापुढे करणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील अजनी व खापरी येथे होणाऱ्या इंटर मॉडेल स्टेशनचे सादरीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे विभागीय अधिकारी चंद्रशेखर त्यांच्यापुढे करतील. सायंकाळी ते खापरी येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देणार आहेत.

राजकीय वर्तुळात तर्कवितर्क 
नुकतेच दिल्लीत ‘आप’चे २० आमदार निवडणूक आयोगाने अपात्र घोषित केले. यावरून ‘आप’ नेत्यांकडून भाजपवर चौफेर हल्ला करणे सुरू आहे. भाजपवर तोंडसुख घेत असतानाच  केजरीवाल यांच्या दोनदिवसीय नागपूर दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळातही तर्कवितर्क लावले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृहनगर असल्याने नागपूर विरोधकांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. नागपुरातील प्रकल्पातील त्रुटी किंवा खर्चावरून भाजपची कोंडी करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून तर केजरीवाल नागपूरला येत नाही ना? असा प्रश्‍नही आता चर्चिला जात आहे.

Web Title: nagpur news kejariwal attraction to municipal scheme