पाऱ्यात सात अंशांची घसरण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

नागपूर - नैर्ऋत्य मोसमी पावसाने विदर्भातून निरोप घेतल्यानंतर आता हळूहळू थंडीचाही जोर वाढत आहे. शहरात गेल्या चार दिवसांत तब्बल सात अंशांची घसरण झाली असून, नोव्हेंबर उंबरठ्यावर असल्यामुळे थंडी आणखी वाढणार आहे. 

साधारणपणे ऑक्‍टोबर महिना सुरू झाला की विदर्भात थंडीची चाहूल लागते. मात्र यावर्षी दोन आठवडे पावसाळा लांबल्याने थंडीलाही उशीर झाला. त्यामुळे दिवाळीतही थंडी जाणवली नाही. पावसाळी वातावरण गायब झाल्यापासून पाऱ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या 22 ऑक्‍टोबरला 24 अंशांपर्यंत गेलेले किमान तापमान गुरुवारी 16.5 अंशांवर आले. कमाल तापमानातही किंचित घट दिसून आली. कडाक्‍याच्या थंडीचा नोव्हेंबर महिना लवकरच सुरू होत असल्यामुळे या आठवड्यात थंडी अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. तसे संकेत नागपूर हवामान विभागाने दिले आहेत. 

Web Title: nagpur news low temperature winter