चंद्रग्रहणाचा योग बुधवारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

नागपूर - येत्या बुधवारी (ता. ३१) खग्रास चंद्रग्रहण असून हा चंद्र नेहमीसारखा न  राहता लालसर रंगाचा दिसणार आहे. याला खगोलशास्त्रज्ञ ‘ब्लड मून’ असे संबोधतात, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली आहे. या दिवशी चंद्र ९ अंश ६ कला व ५२ विकलावर राहणार आहे, असेही ते सांगतात.

भ्रमण करताना चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल आणि त्यावेळी चंद्राला ग्रहण लागले असेल, तर त्याचा रंग लाल होतो. असा योग साधारणतः वीस वर्षांतून एकदा येतो, असे पुराणात म्हटले आहे. 

या दिवशी सायंकाळी ५.१८ वाजता ग्रहणस्पर्श, ६.२१ वाजता संमीलन, ६.५९ ला ग्रहणमध्ये, ७.३७ वाजता उन्मीलन, ८.४१ वाजता मोक्ष आणि पहाटे ३.२३ वाजता पर्वकाळ होईल. नागपूर व विदर्भाच्या परिसरातील गावांसाठी सूर्यास्त ते मोक्षापर्यंतचा काळ म्हणजे रात्री ८.४१ पर्यंत पुण्यकाळ राहील, असेही त्यांनी सांगितले. देशाच्या अतिपूर्वेकडील भागातून चंद्रग्रहणाला सुरुवात होईल. अगरताला, कुचबिहार, दार्जिलिंग, दिब्रुगड, गंगटोक, इम्फाळ, इटानगर, कोलकता, कोहिमा, शिलाँग या गावांना चंद्रोदयानंतर ग्रहणस्पर्श होईल. भारतासह संपूर्ण आशिया खंड, अमेरिका, इशान्येकडील भाग, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक आणि हिंद महासागर या भागातून ग्रहण दिसणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात ग्रहण लागलेलेच चंद्रबिंब उदयास येईल. खग्रास स्थिती दिसेल व त्यानंतर ८.४१ वाजता ग्रहणमोक्ष होईल, असे डॉ. वैद्य यांनी कळविले आहे.

Web Title: nagpur news Lunar eclipse at wednesday