महालक्ष्मींच्‍या हारांची जोडी @ पाच हजार रुपये  

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

नागपूर - गणपती पाठोपाठ ज्येष्ठ गौरी (महालक्ष्मी) आवाहन आणि पूजेसाठी फुलांची मागणी वाढली आहे. आठ दिवसांपासून हारांची मागणी फूल विक्रेत्यांकडे नोंदविली जाते. मागीलवर्षी पेक्षा आवक कमी असल्याने यंदा फुलांच्या हारांचे भावात किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे महालक्ष्मी पूजेच्या हारांच्या जोडीचे दर ९०० ते ५००० रुपयांपर्यंत गेले असले तरी नोंदणीला अल्प प्रतिसाद आहे. 

महालक्ष्मीमधील हारांचा व्यवसाय २० ते २२ लाखांचा आहे. सर्वच प्रमुख विक्रेत्याकडे  हारांसाठी ‘बुकिंग’ दरवर्षी जोमात होते. यंदा त्यात घट झालेली आहे. आज मंगळवार ज्येष्ठगौरीचे आवाहन असून, बुधवारी पूजा होणार आहे. या पूजेसाठी खास हार तयार करण्यात येतात. हा सण साजरा करण्यात कोणतीही कसर ठेवण्यात येत नसल्याने हारांचे ‘बुकिंग’ जोमाने होत होते. यंदा मात्र, त्याला प्रतिबंध बसला आहे, असे लक्ष्मीभुवन चौकातील राम महाजन फूल भंडारचे संचालक दिलीप महाजन यांनी सांगितले. लक्ष्मीसाठी शेवतींच्या फुलाच्या हाराला सर्वाधिक  मागणी असते. त्याची किंमत १२०० ते १५०० या दरम्यान आहे. यंदा शेवंतीचे उत्पादन कमी असल्याने त्यात वाढ झाली आहे, अशी माहिती फूलविक्रेते शेखर रणनवरे यांनी दिली. निशिगंधांच्या फुलांच्या हाराचा दर १८०० ते २२०० च्या घरात असून, लिलीच्या हारासाठी २५०० ते तीन हजार रुपये मोजण्याची तयारी असते. गुलांबाच्या पाकळ्यांच्या फुलांच्या दराने यंदा विक्रम केला आहे.  हाराच्या जोडीचा दर पाच हजार रुपयांवर पोहोचला आहे. तरीही मागणी वाढली आहे, असे महाजन म्हणाले. 

शहरात बर्डी, इतवारी, सदर, धरमपेठ, महाल, सक्करदरा, देवनगर, छोटा ताजबाग परिसरातील दुकानदाराची लगबग सुरू आहे. यंदा मात्र, हाराची बुकिंगच नसल्याने व्यवसाय प्रभावित झालेला आहे. मागणीपेक्षा फुलांची आवक कमी असल्याने भाव गगनाला भिडले आहे. शहरात सध्या नाशिक, बंगळूर, हैदराबाद, पुणे, दिल्ली येथून फुलांची आवक सुरू आहे. पूजेच्या फुलांची आवक स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे. आज नऊ ते दहा वाहनाने फुलांची आवक झाल्याचे जयंत रणनवरे म्हणाले.

Web Title: nagpur news mahalaxmi