राजकीय विश्‍वासार्हता परत आणत आहे - मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नागपूर - गेल्या काही वर्षांत राजकीय नेत्यांची विश्‍वासार्हता संपली होती. ही विश्‍वासार्हता पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मराठी पत्रकार परिषदेतर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळयात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ""सोशल मीडिया आल्यापासून पत्रकारितेची विश्‍वासार्हता संपत चालली आहे. कोणतीही खातरजमा न करता केवळ गॉसिपिंगसाठी बातम्या टाकल्या जातात. त्यावर प्रतिक्रिया उमटल्यास त्या काढून घेतल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून राजकीय नेत्यांचीही विश्‍वासार्हता संपली होती. राजकीय नेत्यांच्या वक्तव्यावर व आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवण्याचे दिवस संपले होते. आता पुन्हा या आश्‍वासनांवर लोकांनी विश्‍वास ठेवावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. ही गोष्ट फार कठीण आहे. परंतु त्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीत आहे.'' मुख्यमंत्र्यांचा इशारा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडे होता. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही; परंतु त्यांचे संकेत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीकडे होता. 

कर्जमाफीच्या निर्णयाने विकासकामांवर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, ""महाराष्ट्राने सर्वांत मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. यामुळे 34 हजार कोटी रुपयांचा भुर्दंड तिजोरीवर पडणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेणे आवश्‍यक झाले होते. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला, तरी या निर्णयाचा राज्याच्या विकासकामांवर परिणाम तर होणार नाही ना, असे प्रश्‍न आता विचारले जात आहेत.'' 

Web Title: nagpur news maharashtra cm political credibility