बौद्धिक खेळांतून करणार मराठी समृद्ध 

मंगेश गोमासे
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

नागपूर - आपल्या पाल्याचे मातृभाषेऐवजी इंग्रजीवर अधिक प्रभुत्व असावे, अशीच पालकांची भावना असते. त्यामुळे मराठी शाळा सोडून ‘कॉन्व्हेंट’मध्येच टाकण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे मुलांना धड इंग्रजी सोडा, मराठीही येत नाही. मात्र, राज्य मराठी विकास संस्थेद्वारे आता विद्यार्थ्यांची मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खेळांच्या माध्यमातून मराठी भाषेचा विकास करण्याचा उपक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. 

काही वर्षांपासून विद्यार्थ्यांवर  इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. अनेक शब्दांचे मराठी अर्थही त्यांना सापडत नाहीत. शिवाय पशू, पक्षी यांची नावे मराठीत नेमकी काय, हेसुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नसते. त्यामुळे मराठी भाषा कुठेतरी संपत चालली असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने राज्य मराठी विकास संस्थेद्वारे उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ‘हौऊजी’ खेळाप्रमाणे मराठीतही खेळ तयार करून त्याद्वारे मराठी विषयातील ज्ञान वाढविण्यात येणार आहे. तसे खेळ तयार करण्यास संस्थेकडून सुरुवात करण्यात आली. बऱ्याच प्रमाणात खेळही तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, चौथी ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी हे खेळ तयार करण्यात येतील. यासाठी राज्यभरातील मराठी भाषेतील उत्कृष्ट शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. पुढल्या वर्षीपासून हा उपक्रम राज्यभर सुरू होईल.  

पक्षी, प्राण्यांची नावेही मराठीतून 
मराठी भाषेत अनेक पक्षी आणि प्राण्यांची नावे नाहीत. त्यामुळे ही नावे मराठीतून करण्याच्या उद्देशाने राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद कातीकर यांनी नागपुरात माजी संमेलनाध्यक्ष डॉ. मारुती चितमपल्ली यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला; मात्र भेट झाली नाही. त्यामुळे भ्रमणध्वनीवरून संवाद साधून डॉ. कातिकर यांनी आपला मनोदय व्यक्त केला. त्यावर साहित्य प्रसार केंद्रात असलेल्या त्यांच्या पुस्तकांचा आधार घेत, पक्षी आणि प्राण्यांची नावे मराठीतून विद्यार्थ्यांना देण्यावर संस्था भर देणार आहे. 

मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. किमान भाषा सुधारण्यावर संस्थेचा भर आहे. त्यासाठी संस्था ‘हौऊजी’ खेळाप्रमाणे मराठीतूनही खेळ तयार करण्यावर भर देत आहे. 
डॉ. आनंद कातिकर,  संचालक,  राज्य मराठी विकास संस्था

Web Title: nagpur news marathi