मेट्रो कोचवर दिसणार शहराची संस्कृती 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

नागपूर -  मेट्रो रेल्वेचे तीन डबे बुधवारी शहरात दाखल झाले. जमिनीवरील ट्रॅकवर चाचणीची आता नागपूरकरांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मेट्रो रेल्वेच्या तीन डब्यांवर शहराच्या संस्कृतीची झलक दिसणार असल्याचे समजते. यासंबंधातील कामे उद्या सकाळी पूर्ण करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. 

शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पातील कामे वेगाने सुरू आहे. मिहान कार डेपो ते खापरी या पाच किमीचे जमिनीवरील मेट्रोचे ट्रॅक तयार झाले. मागील आठवड्यात कार डेपोमध्ये मेट्रो डबे एका ठिकाणावरून दुसऱ्या ट्रॅकवर हलविण्यासाठी शंटिंग वाहन दाखल झाले. मेट्रोच्या तिन्ही डब्यांवरून विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पडदा उठला. क्रेनच्या साहाय्याने हे डबे ट्रकवरून ट्रॅकवर ठेवण्यात आले. त्यानंतर एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर बुलंद या शंटिंग वाहनाने नेण्यात आले. उद्या या डब्यांवर नागपूर शहराची संस्कृती, इतिहास रेखाटण्यात येणार आहे. प्रथमच मेट्रोच्या ताफ्यात दाखल झालेल्या या डब्यांवर शहराची संस्कृतीचे दर्शन व्हावे, अशी थीम असल्याची पुस्तीही सूत्राने जोडली. याशिवाय उद्या हे तीन डबे एकमेकांना जोडण्यात येणार असून, तांत्रिक बाबींचीही तपासणी करण्यात येणार आहे. 

उद्या नागरिकांना संधी? 
मेट्रोचे डबे शहरात आल्यानंतर नागपूरकरांनाही ते जवळून बघण्याची उत्सुकता आहे. शनिवारी नागरिकांसाठी मिहान कार डेपो खुले करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

Web Title: nagpur news metro