अंतिम आराखड्यातही फेरबदल होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नागपूर - मेट्रो रिजनचा आराखडा राज्य शासनाने अंतिम केल्यानंतरही पुन्हा नव्याने २८४ बदल केले जात आहेत. त्याकरिता नव्याने सूचना व आक्षेप मागविण्यात आले आहेत. एकप्रकारे पूरक आराखडाच तयार केला जात असल्याने नागपूर सुधार प्रन्यासच्या एकूणच कारभारावर शंका घेतली जात आहे. आराखडाच बदलवायचा असेल इतरांच्याही आक्षेपांचा  विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

हॅल्को इंडिया कंपनीने आराखडा तयार केला तेव्हापासूनच नागरिकांची ओरड सुरू झाली. सॅटेलाइट इमेज घेऊन टेबल आराखडा तयार केल्याचा आरोप कंपनीवर होता. तलावाच्या जागेवर मोकळे मैदान आणि सुपीक जमिनीवर डम्पिंग यार्ड त्यात दर्शवण्यात आले होते. रामागाव तलाव वगळून कृषी क्षेत्र करण्यात आले. त्याचप्रमाणे तामसवाडी, सोनेगाव, अमगोंदडी कृषी क्षेत्राला निवासी करण्यात आले होते. याविरोधात आंदोलनेसुद्धा झाली होती. नागपूर जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यांमधील ७१९ गावांचा मेट्रो रिजनमध्ये समावेश करण्यात आला आहे. आराखड्यात अनेक त्रुटी असल्याने तब्बल सहा हजारांवर लोकांनी आक्षेप नोंदविले होते. त्यापैकी ९३९ आक्षेपांचाच विचार करण्यात आला. मंत्रालयात त्यात परस्पर काही बदल केल्याचाही आरोप  आहे. आर-१ आणि आर-२ (निवासी क्षेत्र) यातून वगळण्यात आल्याने काही विशिष्ट लोकांसाठी आराखड्यात फेरबदल केल्याचे स्पष्ट होते. 

काही ढोबळ चुका झालेल्या ९३९ दुरुस्त्या करण्यात आल्या. ते करताना काही पुढारी व अधिकाऱ्यांचे हित जोपासण्यात आल्याचा आरोप होत आहे. 

कालपर्यंत ग्रामपंचायती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार हिरावले जाणार नाहीत, असा दावाही केला जात होता. प्रत्यक्षात मात्र मेट्रो रिजनमध्ये समावेश असलेल्या गावांचा विकास तसेच विकास शुल्क सुधार प्रन्यासतर्फे आकारले जाणार आहेत.

सर्वांच्या तक्रारीचा विचार व्हावा 
आता नवीन बाब समोर आली. आराखड्यात नव्याने २८४ बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यावर नव्याने हरकती व आक्षेप मागविण्यात आले आहेत. एकदा अंतिम केलेला आराखडा पुन्हा बदलविला जाऊ शकत असेल तर सर्वांच्या आक्षेप व तक्रारींचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: nagpur news metro region final plan changes