संघाने घेतले मंत्री व आमदारांचे बौद्धिक

संघाने घेतले मंत्री व आमदारांचे बौद्धिक

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी बुधवारी सकाळी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात मंत्री आणि भाजपच्या आमदारांचे बौद्धिक घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वर्गाला उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार आशीष देशमुख यांच्यासह अनेकांनी दांडी मारली.

बुधवारी सकाळी एकापाठोपाठ एक हजेरी लावणे सुरू केले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक आमदारांनी हेडगेवार स्मृती मंदिरात रा. स्व. संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला अभिवादन केले. महर्षी व्यास सभागृहात रा. स्व. संघाचे नागपूर सहसंघचालक श्रीधर गाडगे, विदर्भ संपर्कप्रमुख दीपक तामशेट्टीवार यांनी मंत्री व आमदारांना मार्गदर्शन केले. प्रत्येक आमदार व मंत्र्याला संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे "हिंदू आणि हिंदुत्व' हे पुस्तक देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी स्मृती मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी केली. सोबत असलेल्या मंत्र्यांना या बांधकामाबाबत त्यांनी माहिती दिली.

बौद्धिकाला एकनाथ खडसे, विनोद तावडे, रणजित पाटील, अनुपस्थित होते. काही लोकांनी आपल्या विभागात निवडणुका आहेत व वैयक्तिक काम सांगून न येण्याचे कारण दिले होते. जे आमदार कोणतेही कारण न देता गैरहजर राहिले, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.
- राज पुरोहित, प्रतोद भाजप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com