मोबाईल सर्व्हिलन्स व्हेइकलचे शहर सुरक्षेला बळ 

राजेश प्रायकर
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

नागपूर - स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील चौकांचौकांमध्ये तूर्तास सातशे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. या प्रकल्पाला आता मोबाईल सर्व्हिलन्स व्हेईकलचीही जोड मिळणार असल्याने शहराची सुरक्षा आणखी बळकट होणार आहे. या वाहनाद्वारे जत्रा, दंगलीचे ठिकाण, जाहीर सभेतील घडामोडी कॅमेऱ्यात कैद होणार असून, पोलिस तसेच महापालिकेला नियंत्रणासाठी पर्याय मिळणार आहे. स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन ही स्मार्ट सिटी एसपीव्ही कंपनी स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्प साकारत आहे. एल ॲन्ड टी या प्रकल्पाचे काम करीत असून,  आतापर्यंत शहरात सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत.

नागपूर - स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील चौकांचौकांमध्ये तूर्तास सातशे सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. या प्रकल्पाला आता मोबाईल सर्व्हिलन्स व्हेईकलचीही जोड मिळणार असल्याने शहराची सुरक्षा आणखी बळकट होणार आहे. या वाहनाद्वारे जत्रा, दंगलीचे ठिकाण, जाहीर सभेतील घडामोडी कॅमेऱ्यात कैद होणार असून, पोलिस तसेच महापालिकेला नियंत्रणासाठी पर्याय मिळणार आहे. स्मार्ट ॲन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन ही स्मार्ट सिटी एसपीव्ही कंपनी स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्प साकारत आहे. एल ॲन्ड टी या प्रकल्पाचे काम करीत असून,  आतापर्यंत शहरात सातशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. एल ॲण्ड टीने या प्रकल्पात मोबाईल सर्व्हिलन्स व्हेईकलचाही समावेश केला असून, यापूर्वी बंगळूर शहरासाठी असे वाहन तयार केले आहे. शुक्रवारी बंगळूरकडे जाताना मोबाईल सर्व्हिलन्स वाहन महापालिकेत आणण्यात आले. आयुक्त अश्‍विन मुदगल यांच्यापुढे या वाहनांची वैशिष्ट्ये सांगण्यात आली. मुळात मोबाईल सर्व्हिलन्स वाहन पोलिसांसाठी राहणार आहे. परंतु, शुक्रवारी या वाहनाचे प्रात्यक्षिक महापालिकेत दाखविण्यात आले. त्यानंतर ते वाहन बंगळूरकडे रवाना झाले. 

वायरलेस सीसीटीव्ही कॅमेराची जोड
हे वाहन अत्याधुनिक असून, यात चार लहान टीव्ही आणि एक मोठा टीव्ही आहे. हे वाहन ज्या ठिकाणी उभे करण्यात येईल, त्या परिसरातील झाडे किंवा खांबावर वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येईल. या वायरलेस सीसीटीव्ही कॅमरेद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. याशिवाय या वाहनाला सहा मीटर उंच टॉवर असून, या माध्यमातून शहरातील चौकात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमरेलाही जोडता येणार आहे. या वाहनाला ड्रोनचीही जोड राहणार आहे. 

मोबाईल सर्व्हिलन्स व्हेइकलचे प्रात्यक्षिक काल बघितले. शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे. स्मार्ट ॲन्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत शहरासाठी तूर्तास पाच मोबाईल सर्व्हिलन्स व्हेइकल घेण्यात येईल. पुढील दोन महिन्यात हे वाहन शहराच्या सेवेत दिसून येईल. त्यामुळे शहरातील गर्दीचे ठिकाणावर पोलिसांना नियंत्रण ठेवता येईल. 
- आश्‍विन मुदगल, आयुक्त, महापालिका.

गर्दीवर नजर
कस्तुरचंद पार्क येथील जाहीर सभा, दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त लाखो अनुयायी शहरात येतात, या गर्दीतील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी हे वाहन पोलिसांना फायदेशीर ठरणार आहे. याशिवाय दंगलीच्या ठिकाणांवरील घडामोडीवर लक्ष ठेवण्यासाठीही हे वाहन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या वाहनांमुळे सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासही मदत होणार आहे. 

Web Title: nagpur news mobile City security