मातेच्या किडनीतून मुलाला जीवदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर - बत्तीस वर्षीय तरुण मुलाच्या दोन्ही किडनी निकामी झाल्याने डायलिसीसवर श्‍वास सुरू होता. लेकराचा जीव वाचवण्यासाठी मातेने आपली किडनी देऊन नव्याने जीवदान दिले. नीलेश असे किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णाचे नाव आहे. मातेचे नाव सुशीला तान्होलकर असे आहे.  

अमरावती येथील बत्तीस वर्षीय नीलेश तान्होलकर गेल्या अनेक दिवसांपासून डायलिसीसवर होता. मुलाला होत असलेला त्रास बघून आईचे काळीज तुटत होते. अखेर माता सुशीला तान्होलकर (वय ५५) यांनी आपल्या मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. 

आईने पुन्हा लेकराला आयुष्य मिळावे म्हणून किडनीदान करून आपल्या मुलाला नव्याने जीवदान दिले. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आणि सुपरचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मधुकर परचंड यांच्या मार्गदर्शनात हे प्रत्यारोपण झाले. डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. संजय कोलते, डॉ. विशाल रामटेके, डॉ. समीर चौबे, डॉ. धनंजय सेलूकर आणि डॉ. विजय श्रोते यांनी किडनी प्रत्यारोपण केले. तर ज्या चाचण्यांशिवाय किडनी प्रत्यारोपण शक्‍य नाही, अशा सर्व रक्तचाचण्या पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. संजय पराते, जीवरसायन विभागप्रमुख डॉ. सोनुने, डॉ. महाजन यांनी केल्या. पॅथॉलॉजी आणि जीवरसायन चाचण्यांमध्ये किंचितसाही फरक जाणवला तर किडनी प्रत्यारोपण करता येत नाही, हे विशेष. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे १९ वे किडनी प्रत्यारोपण झाले.

Web Title: nagpur news mother's kidney

टॅग्स