मेडिकलच्या त्वचारोग विभागातील औषधालय हलवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) त्वचारोग विभागात असलेले औषधालय बाह्यरुग्ण विभागापासून बरेच दूर आहे. विशेष असे की, उकाड्यात बाह्यरुग्ण विभागातून पायी चालत औषधालयात जावे लागते. याशिवाय पावसाळ्यात औषधासाठी भिजत जावे लागते, कोणतेही शेड नाही. यामुळे त्वचारोग विभागातील औषधालय वॉर्डात असलेल्या एका खोलीत हलविण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे. विशेष असे की, त्वचारोग विभागासह मेडिकलच्या विविध विभागांत कार्यरत औषधी निर्मात्यांना अंतर्गत बदली नको असल्याची माहिती पुढे आली आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी हे औषधी निर्माते कार्यरत असल्याचे दिसून येतात.  

मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागातील औषध वितरण विभाग, त्वचारोग विभाग तसेच मेडिसीन स्टोरमध्ये कार्यरत औषधी निर्मात्यांची गेल्या कित्येक वर्षांत बदली झाली नाही. कामाचा अतिरिक्त बोजा असल्याचे कारण पुढे करीत एकाच ठिकाणी राहण्यासाठी सारे औषधी निर्माते (फार्मासिस्ट) प्रयत्नशील असतात. या साऱ्यांची अंतर्गत बदली करण्यात यावी, अशी चर्चा मेडिकलच्या अधिष्ठाता कक्षात सुरू होती. 

मेडिकल ४७ वॉर्ड, कॅज्युअल्टीत, बाह्यरुग्ण विभागातील औषधालय, मेडिकल स्टोरसह क्षयरोग विभाग तसेच इतरही अनेक विभागांत औषध निर्मात्याची पदे आहेत. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी हे काम करीत असतात. 

सर्वाधिक काम असलेल्या औषध वितरण विभागात ठिकाणी औषधी निर्माते काम करण्यास तयार नसतात. गेल्या दशकापासून एकाही औषधी निर्मात्याची विभाग सोडून इतर ठिकाणी बदली झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मेडिकल, सुपर आणि मेयो किमान या ठिकाणी कार्यरत असलेल्या औषधी निर्मात्यांना तीन वर्षांतून एकदा तरी हलविण्यात यावे, अशी चर्चा खुद्द डॉक्‍टरांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मेडिकल स्टोरमध्ये गेल्या दहा वर्षांपासून एकाच टेबलवर काम करीत असलेला औषधी निर्माता टेबल सोडत नाही. पदोन्नतीसाठी पात्र असूनही पदोन्नती नाकारणारे औषध निर्माते मेडिकलमध्ये कार्यकत आहेत.

पदोन्नतीशिवाय एकाच ठिकाणी नोकरी करायला मिळत असल्याचे समाधान मोठे असल्याचे एका औषधी निर्मात्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.  

मेडिकलच्या त्वचारोग विभागातील औषधालयांबाबत अनेक रुग्णांच्या नातेवाइकांच्या तक्रारी आल्या आहेत. विभागापासून हे औषधालय दूर आहे. ऊन, पावसात रुग्णांना औषध घेण्यासाठी जावे लागते. विभागप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर ठरवता येईल. तसेच औषधी निर्मात्यांच्या सुपर, मेडिकलमध्ये अंतर्गत बदलीसंदर्भातही विचार करता येईल. 
-डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.

Web Title: nagpur news move the dispensary of the medical department

टॅग्स