सात दिवसांत बंद करा दारं- खिडक्‍या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

नागपूर - उच्चदाब विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने गंभीररीत्या होरपळलेल्या जुळ्या भावांपैकी एकाचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वीजतारांखाली धोकादायक पद्धतीने वास्तव्यास असणाऱ्यांना एसएनडीएलकडून कारवाईची नोटीस बजावण्यात येत आहे. आरमर टाऊनशिपमधील १६ रहिवाशांना सात दिवसांच्या आत बालकनीतील दारे, खिडक्‍या कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश नोटीसमार्फत बजावण्यात येत आहे. 

समाजमन सुन्न करणाऱ्या सुगतनगरातील आरमर टाऊनशिप येथील घटनेमुळे विद्युत वाहिन्यांखाली असलेल्या शहरातील शेकडो धोकादायक घरांचा प्रश्‍न ऐरणीवर आला. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी मनीष वाठ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी उच्चदाब वाहिनीखाली एक-दोन नव्हे तर तब्बल १६ घरे असल्याचे पुढे आले. ही बाब गांभीर्याने घेत वाठ यांनी सर्व १६ घर मालकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यानुसार एसएनडीएलकडून  नोटीस बजावण्यात येत आहे. सात दिवसांच्या आत बालकनीच्या दिशेने उघडणारी दारे, खिडक्‍या सिमेंट काँक्रिटने कायमस्वरूपी बंद करावी अन्यथा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे दिला आहे. शहरात शेडको धोकादायक मालमत्ता असून, त्यांचा शोध घेऊन सर्वांनाच आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे.  

एसएनडीएलने दिला माणुसकीचा परिचय 
इलेक्‍ट्रिकल निरीक्षकाने घटनास्थळाच्या निरीक्षणानंतर प्रियांशच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. ही रक्कम एसएनडीएल आणि बिल्डरने अर्धी-अर्धी देण्याचे निरीक्षकांनी अहवालात म्हटले आहे. पण, घटनेपासून बिल्डर पुढे आलाच नाही. आज एसएनडीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन मानवतेच्या आधारावर साडेसहा लाखांची मदत धर कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सव्वा लाखाचा धनादेश देण्यात आला होता. आज सायंकाळी ५.२५ लाखांचा धनादेश कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

Web Title: nagpur news mseb vidarbha

टॅग्स