मुंबई विद्यापीठ करणार परीक्षा पद्धतीचा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

नागपूर - परीक्षा यंत्रणा कोलमडल्यामुळे मुंबई विद्यापीठावर प्रचंड टीका झाली.  विशेषत: ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासणीची यंत्रणाच बंद पडली. नागपूर विद्यापीठाने ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासणी अत्यंत सुनियोजित पद्धतीने राबविली. या यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी चमू नागपुरात येणार आहे. यापूवीर्ही एका चमूने परीक्षा पद्धतीचा अभ्यास केला होता, हे विशेष.

नागपूर - परीक्षा यंत्रणा कोलमडल्यामुळे मुंबई विद्यापीठावर प्रचंड टीका झाली.  विशेषत: ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासणीची यंत्रणाच बंद पडली. नागपूर विद्यापीठाने ऑनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासणी अत्यंत सुनियोजित पद्धतीने राबविली. या यंत्रणेचा अभ्यास करण्यासाठी चमू नागपुरात येणार आहे. यापूवीर्ही एका चमूने परीक्षा पद्धतीचा अभ्यास केला होता, हे विशेष.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने दोन वर्षांत परीक्षा आणि निकालांबाबत केलेल्या आमूलाग्र सुधारणांचे परिणाम आता दिसून येत आहेत. नागपूर विद्यापीठाला निम्म्या परीक्षा संलग्नित कॉलेजेसला देता आलेल्या नाहीत. त्यामुळे पहिल्या ते अंतिम सेमिस्टरपर्यंतच्या परीक्षा घेण्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू  डॉ. प्रमोद येवले यांनी अनुभव पणाला लावत यंदा परीक्षांचे चांगले नियोजन केले.

त्यानुसार, उन्हाळी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षा सोमवारी संपली  असून, मंगळवारपासून विद्यापीठाच्या नियमित सेमिस्टरच्या परीक्षा सुरू होणार आहेत. यावर्षी नापास विद्यार्थ्यांच्या परीक्षा आधी घेऊन विद्यापीठाने परीक्षांचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजनासाठी अधिक संख्येने प्राध्यापक उपलब्ध राहतील, असा प्रयत्न केला आहे. केवळ कला शाखा वगळता इतर विद्याशाखांमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत. परीक्षेचे वेळापत्रकही योग्यरीत्या तयार केल्याने उत्तरपत्रिका तपासणीदेखील तातडीने सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे निकालदेखील निर्धारित वेळेत घोषित होत आहेत. 

वेळ, श्रमाची बचत
ऑनलाइन प्रश्‍नपत्रिका पाठविण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने परीक्षा विभागावरील मोठा ताण कमी झाला आहे. यापूर्वी प्रत्येक परीक्षेच्या छापील प्रश्‍नपत्रिका चार जिल्ह्यांतील सहाशेहून अधिक केंद्रांवर पाठवण्यात येत होत्या. मानवी हस्तक्षेप असणारी ही यंत्रणा धोकादायक होती. एक चूक झाली तरी परीक्षा यंत्रणेला धक्का बसत होता. मात्र, आता ऑनलाइन पेपर पाठविण्यात येत असल्याने वेळ आणि मानवी श्रमदेखील वाचवलेले आहेत.

Web Title: nagpur news mumbai university