‘केपी’वर महापालिका देणार अतिरिक्त शपथपत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

नागपूर - अनेक ऐतिहासिक कार्यक्रम व घटनांचे साक्षीदार असलेल्या कस्तुरचंद पार्क मैदानाच्या संवर्धनासंदर्भातील प्रकरणात महानगरपालिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अतिरिक्त शपथपत्र सादर करणार आहे. त्यासाठी पालिकेने बुधवारी (ता. ५) न्यायालयाला दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला.

व्यावसायिक प्रदर्शने व अन्य विविध कारणांमुळे या मैदानाची दुरवस्था झाली असल्याच्या बातमीची दखल घेऊन उच्च न्यायालयाने याविषयी स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. प्रकरणाचे कामकाज पाहण्यासाठी ॲड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायद्यानुसार सार्वजनिक मैदानांवर एका वर्षामध्ये केवळ ४५ दिवस कार्यक्रम आयोजित करता येतात. परंतु, प्रशासन सदर तरतुदीचे उल्लंघन करून या मैदानावर वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देत होते. त्यामुळे मैदान खराब झाले होते. मैदानावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. सर्वत्र कचरा पसरला होता. न्यायालयाच्या दणक्‍यानंतर प्रशासनाला जाग आली असून आता मैदानाची काळजी घेतली जात आहे. या मैदानाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्तावही विचाराधीन आहे. मनपातर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली. 

Web Title: nagpur news municipal corporation