मनुष्यबळाचा अभाव; वाहने खरेदीवर भर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

नागपूर - महापालिकेच्या अग्निशमन विभागात केवळ दोनशेवर कर्मचाऱ्यांवर शहराची जबाबदारी आहे. अनेकदा चालक नसल्याने सुटीवरील कर्मचाऱ्यांना बोलावले जाते. कर्मचारी भरतीची गरज असताना वाहने खरेदी करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. आग विझविण्यासाठी सक्षम मानले जाणारे स्नार्कर (हायड्रोलिक प्लॅटफॉर्म) मशीन खरेदी केले जाणार आहे.

शहरात बहुमजली इमारतींचे जाळे निर्माण होत आहे. इमारतींमध्ये आग लागल्यास ती विझविण्यासाठी महापालिकेने मागील वर्षी आठ कोटी खर्च करून ऑस्ट्रेलियाच्या कंपनीकडून टीटीएल मशीन खरेदी केले. ४२ मीटर उंच इमारतींना आग लागल्यास टीटीएल मशीन उपयोगात येणार आहे. 

आता तब्बल ३२ मीटर उंच इमारतीपर्यंत पाण्याचा मारा करण्यासाठी उपयोगी ठरणारी स्नार्कर खरेदी करण्यात येणार आहे.

अग्निशमन विभागात सध्या वाहने भरपूर असून, ती चालविण्यास चालकच नाहीत. शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे. अग्निशमन विभाग दोनशवेर कर्मचाऱ्यांच्या बळावर सुरक्षा पुरविण्याची कसरत करीत आहे. 

शहराची वाढती सीमा, दररोजच्या घटनांमुळे अग्निशमन विभागावरील ताण वाढला; परंतु कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही.

आकृतिबंधाला मंजुरी नाही
महापालिका सभागृहाने अग्निशमन विभागातील भरतीसाठी आकृतिबंधाला मंजुरी दिली. मात्र, राज्य शासनाने अद्यापही मंजुरी दिली नाही. त्यामुळे विभागाला अपुऱ्या मनुष्यबळावर कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे वाहने खरेदीचा मोहही कायम असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: nagpur news Municipal corporation's fire department

टॅग्स