महापालिकेचे तीनच शिक्षक आदर्श 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

नागपूर - हजारावर शिक्षक असलेल्या महापालिकेच्या शाळांमधून केवळ तीनच शिक्षक आदर्श असून, त्यांना आज महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. मागील वर्षी ६ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. त्यामुळे आदर्श शिक्षकांच्या संख्येत घट होत असल्याचे चित्र आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांबाबतही हीच स्थिती असून, यंदा १२ शिक्षकांचा गौरव करण्यात आला. मागील वर्षी त्यांची संख्या चाळीस होती. आदर्श शिक्षक पुरस्कार पटकावणारे एकाच शाळेतील शिक्षक आहे, हे विशेष. 

काल सायंकाळपर्यंत केवळ दोनच आदर्श शिक्षकांची नावे निश्‍चित होती. रात्रभरात  महापालिकेच्या शिक्षण विभागाने तिसऱ्या आदर्श शिक्षकांचाही शोध घेतला. शिक्षक दिनानिमित्त आज विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते  संजयनगर हिंदी माध्यामिक शाळेचे सुधाकर आमधरे, मनीषा मोगलेवार, अशोक चौधरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार, उपमहापौर  दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नागेश  सहारे, प्रमोद तभाने, संजय बंगाले, रूपा राय, प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १२ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. मागील शैक्षणिक सत्रात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. एकेकाळी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी महापालिकेत रस्सीखेच होती. मात्र, आता महापालिकेच्या समितीला आदर्श शिक्षक शोधताना  घाम गाळावा लागत आहे. आदर्श शिक्षकांना पदोन्नती किंवा वेतनवाढही दिली जात होती. ती बंद केल्याने आदर्श शिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्यासाठीही निरुत्साह दिसून येतो. 

विद्यार्थ्यांचे कौतुक 
या वेळी दुर्गानगर माध्यमिक शाळेचा विद्यार्थी अविनाश शेंडेचा सत्कार करण्यात आला. त्याने  तीन महिलांचे प्राण वाचविले होते. ३१ जुलैला राजू डोनारकर यांच्या घरी लागलेल्या आगीतून अविनाशने ३ महिलांना सुखरूप बाहेर काढले. त्याने प्रसंगावधान राखत घरातील इलेक्‍ट्रिक  स्वीच व सिलिंडरचे कॉक बंद केले अन्‌ तिघींचा जीव वाचविला. या त्याच्या धाडसाबद्दल  महापौर जिचकार यांनी त्याचा गौरव केला.

Web Title: nagpur news municipal school teacher