विरसी येथे एकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

कोदामेंढी - निमखेड्याजवळील विरसी येथे गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एकाचा खून झाल्याची घटना घडली. शेतीच्या वादातून हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. सुरजीवत फुलचंद खांडके (वय ३७, विरसी) असे मृताचे नाव आहे. नजीकच्या निमखेडा येथे जाण्यासाठी सुरजित दुचाकीने निघाला असता डाकबंगला (टोली) येथे त्याचा खून करण्यात आला. मारेकरी नेमके कोण आणि किती जण होते, याबाबत काहीही माहिती मिळाली नसून पोलिसांनीही सध्या सांगण्यास नकार दिला. घटनास्थळी अरोली पोलिस पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

कोदामेंढी - निमखेड्याजवळील विरसी येथे गुरुवारी (ता. सहा) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एकाचा खून झाल्याची घटना घडली. शेतीच्या वादातून हा खून झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. सुरजीवत फुलचंद खांडके (वय ३७, विरसी) असे मृताचे नाव आहे. नजीकच्या निमखेडा येथे जाण्यासाठी सुरजित दुचाकीने निघाला असता डाकबंगला (टोली) येथे त्याचा खून करण्यात आला. मारेकरी नेमके कोण आणि किती जण होते, याबाबत काहीही माहिती मिळाली नसून पोलिसांनीही सध्या सांगण्यास नकार दिला. घटनास्थळी अरोली पोलिस पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अरोलीचे ठाणेदार दीपक वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता, सविस्तर माहिती सांगितली नाही. दोन पार्टीचा शेतीचा वाद असल्याने हा खून झाला असावा. सुरजितने याच वर्षी शेती ठेक्‍याने घेतली होती.

१५ दिवसांआधी या शेतीच्या वादाची तक्रार अरोली पोलिस ठाण्यात दाखल झाली होती, असे कळते. शेतीच्या वादाची तक्रार मौदा महसूल विभागातसुद्धा दाखल होती. 

मृत सुरजित हा दहा वर्षांपूर्वीच्या दामू खांडके खून प्रकरणात अटक झाला होता. त्यामुळे त्या प्रकरणातून तर हा खून झाला नसावा, असाही संशय आहे. अरोली पोलिस तपासांत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: nagpur news murder case