अनैतिक संबंधातून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - मित्राशी असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा हातोड्याने डोक्‍यावर हल्ला करून खून केला. हे हत्याकांड बुधवारी सकाळी जरीपटक्‍यात उघडकीस आले. पूनम राकेश गजभिये (वय २२, मलका कॉलनी, समतानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. 

नागपूर - मित्राशी असलेल्या अनैतिक संबंधातून पतीने पत्नीचा हातोड्याने डोक्‍यावर हल्ला करून खून केला. हे हत्याकांड बुधवारी सकाळी जरीपटक्‍यात उघडकीस आले. पूनम राकेश गजभिये (वय २२, मलका कॉलनी, समतानगर) असे मृत महिलेचे नाव आहे. 

राकेश गजभिये हा निर्माणाधीन इमारतीत टाइल्स बसविण्याचे ठेके घेतो. गेल्या दोन वर्षांपूर्वी तो यशोधरानगरातील आजरी-मांजरी येथे आईवडिलांसोबत राहत होता. त्याचा कामाचा विस्तार वाढल्यामुळे त्याने चार मजूर हाताखाली ठेवले. दरम्यान, त्याचे घराशेजारी राहणाऱ्या पूनमशी सूत जुळले. दोघेही प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांच्याही घरून विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्यानंतर दोघांच्याही कुटुंबीयांनी रीतिरिवाजाप्रमाणे लग्न लावून दिले. दोन वर्षे सुखी संसार केल्यानंतर त्यांच्या संसारवेलीवर डेविड नावाचे फूल उमलले. मात्र, दरम्यान एका युवकाशी पूनमचे सूत जुळले. त्याने समजूत घालूनही ती ऐकत नव्हती. मंगळवारी रात्री नऊ वाजता राकेश घरी आला. अनैतिक संबंधातून दोघांचा वाद झाला. त्याने रागाच्या भरात बेडवर झोपलेल्या पूनमच्या डोक्‍यात हातोडीने वार केले. पूनम रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर राकेशने पळ काढला. हे हत्याकांड बुधवारी सकाळी उघडकीस आली. जरीपटका पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पसार झालेल्या राकेशचा शोध पोलिस घेत आहेत.

तीन दिवसांपासून बेपत्ता होती पूनम
राकेशला न सांगता पूनम गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होती. मैत्रिणीकडे मुक्‍कामी जात असल्याचा बहाणा तिने केला होता. मात्र, ती मित्रासोबत बाहेरगावी फिरायला गेली होती. ती घरी आल्यानंतर हा प्रकार राकेशला कळला. त्यामुळे त्याने जाब विचारला असता ती सांगायला तयार नव्हती. याच कारणावरून हत्याकांडापूर्वी दोघांत वाद झाला होता.

भिंतीवर रक्‍ताच्या चिळकांड्या
राकेशने पूनमचा अतिशय निर्घृणपणे हातोडीने वार करून खून केला. पूनमच्या डोक्‍यात हातोडा मारल्यानंतर डोक्‍यातील रक्‍ताच्या चिळकांड्या भिंतीवर सात फुटांपर्यंत दिसून येत होत्या. त्यावरून या हत्याकांडाची तीव्रता दिसून येते. डोक्‍यावर प्रहार एवढ्या जोरात होते की तिच्या नाकातून रक्‍तासह हाडाचा चुरा बाहेर आला होता.

प्रेमात आकंठ बुडाले
राकेशला दारूचे व्यसन जडल्यामुळे त्याच्या घरी मित्रांची गर्दी असायची. अशातूनच त्याच्या एका मित्राशी पूनमचे सूत जुळले. फोनच्या माध्यमातून दोघे जवळ आले. दोघेही सीमा पार करून प्रेमात बुडाले. पूनमही विवाहित असल्याचे विसरून त्याच्यासोबत लग्नास तयार झाली. दरम्यान, राकेशला त्यांच्या प्रेमाची कुणकूण लागली. मात्र, पूनम नेहमी नकार देत होती. त्याने मित्रांशी दुरावा करीत संसार सांभाळण्यास प्राधान्य दिले. मात्र, तिचे अनैतिक संबंध सुरू होते. दोघांत नेहमी खटके उडत असल्यामुळे पूनम माहेरी राहत होती. 

Web Title: nagpur news murder crime