बहिणीच्या रागावरून  बापाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - बहिणीने घरच्यांचा विरोध पत्करून वस्तीतील एका युवकाशी प्रेमविवाह केला. त्यामुळे घरच्यांनी तिच्याशी नाते तोडले. मात्र, लग्नानंतर बहिणीचे पतीसह घरात येणे-जाणे सुरू झाल्यामुळे भावाला ही बाब खटकल्यामुळे तो वडिलांशी भांडत होता. त्याने बहिणीवरील रागाच्या भरात तिला साथ देणाऱ्या वडिलांचा धारदार शस्त्राने खून केला.

ही हत्येची घटना नंदनवन हद्दीतील जगनाडे चौकाजवळील झोपडपट्टीत मंगळवारी रात्री ११.३० सुमारास घडली. 

दिनेश मस्के असे खून झालेल्या व्यक्‍तीचे नाव आहे. तर त्याचा मुलगा प्रफुल्ल मस्के हा आरोपी आहे. मंगळवारी प्रफुल्ल रात्रीला दारू पिऊन आला. दरम्यान, त्याला बहीण आणि तिची मुलगी घरी दिसली. दारूच्या नशेत असल्याने त्याने त्यांना आताच घराबाहेर काढण्यास वडिलांना सांगितले. मात्र रात्र असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यातील वाद विकोपाला गेला आणि अचानक प्रफुल्लने धारदार शस्त्राने वडिलांवर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी आई लता मस्के ही धावून गेली. वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रफुल्लने शस्त्राचे वार करून वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. 

तर इकडे पत्नी लताने वाचवा वाचवा अशी आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी लगेच गंभीर जखमी दिनेश यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्‍टरांनी उपचारादरम्यान त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. 

कुंकू वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न
प्रफुल्लच्या डोक्‍यात राग भरल्यामुळे त्याने वडिलांवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याची आई धावतच पतीला वाचविण्यासाठी धावली. तिने मुलाचे पाय धरले आणि ठार मारण्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने जन्मदात्रीला कोणतीही दयामाया न दाखवता खोट्या इभ्रतीपोटी जन्मदात्याचा खून केला. मुलाच्या रागापुढे आईला कुंकू वाचविता न आल्याची सल आयुष्यभर बोचत राहील.

Web Title: nagpur news murder crime

टॅग्स