बिर्याणी हॉटेल मालकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नागपूर - पाचपावलीतील काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि बिर्याणी हॉटेल मालक अब्दुल्ला खान सईमुल्ला खान (वय ५०, रा. नवी वस्ती टेका) यांचा १० ते १२ जणांनी भरचौकात तलवारीने वार करून खून केला, तर त्यांच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. 

ही थरारक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता पाचपावलीत उघडकीस आली. अशफाक खान साहेब खान (वय ३८, रा. नवी वस्ती, टेका) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. अब्दुल्ला खान यांचे पाचपावलीतील मक्‍का मशिदीजवळ शहनशाह नावाने बिर्याणी हॉटेल आहे. बाजूलाच

 त्यांचा मुलगा इमरान खान (वय २३) याचा पानठेला आहे. बिर्याणी सेंटरमध्ये आरोपी साबीर ऊर्फ चाकू अली मोहम्मद मेमन (वय २४), साजिद (वय २२), रिझवान (वय २३), ईम्मा ऊर्फ शेख इमरान शेख मुजिब (व २१) सर्व रा. कामगार नगर आणि शोएब खान नसिर खान (वय २४, रा. रामकुलर चौक, महाल) हे नेहमीच येत होते. वरील सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, यापूर्वी त्यांच्यावर अनेक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. वस्तीत खंडणी, हप्ता वसुली आणि लूटमार करण्यासाठी परिचित आहेत. महिनाभरापूर्वी ही टोळी अब्दुल्ला यांच्या बिर्याणीच्या हॉटेलमध्ये आली. जेवण केल्यानंतर त्यांनी इमरानच्या पानठेल्यावर सिगारेटचे पाकीट घेतले. मात्र, पैसे नसल्याचे सांगून नंतर देतो म्हणून निघून गेले. त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी साबीर चाकू आणि टोळी पानठेल्यावर आली. त्यांनी सिगारेटचे पाकीट घेऊन पैसे दिले नाहीत. त्यामुळे पानठेलाचालक इमरानने वडील, काका आणि चुलत भावांना सांगितले. दुकानातील नोकर आणि अब्दुल्ला यांनी साबीर चाकूची चांगली धुलाई केली होती. त्याने अब्दुल्लाचा ‘गेम’ करण्याचे ठरविले होते. १५ ऑगस्टला पहाटे चार वाजता साबीर चाकू हा टोळीला घेऊन पानठेल्यावर आला. त्याने अब्दुल्ला यांच्याशी वाद घालून बिर्याणी सेंटरच्या बाहेर खेचले. चौकात नेऊन त्यांच्यावर चाकू-तलवारीने भोसकून खून केला. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी इमरान खानच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपी साबीर चाकू, ईम्मा आणि शोएबला अटक केली.

Web Title: nagpur news murder crime