बापलेकाने केला युवकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जानेवारी 2018

नागपूर - क्षुल्लक वादातून बापलेकाने शेजारी राहणाऱ्या युवकाचा काठीने व दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. आज शनिवारी सकाळी हत्याकांड उघडकीस आले. मंगेश श्रावण खोटे (२७, श्रीहरीनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर जयकिशोर ऊर्फ जॉकी राजकुमार लोन्हारे (२८) आणि राजकुमार नंदलाल लोन्हारे (५६) रा. श्रीहरीनगर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी बापलेकाला पोलिसांनी अटक केली. 

मंगेश आणि आरोपी जॉकी हे शेजारी राहतात आणि दोघेही हातमजुरीचे काम करायचे. दोघेही दारुडे असून मागील काही दिवसांपासून त्यांच्यात बिनसले होते. दोघांमध्ये हाणामारी झाल्यानंतर जॉकीने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती मंगेशने आपल्या आईला सांगितली होती. त्यामुळे मंगेशची आई पुष्पा ही त्याला घेऊन जॉकीच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली होती. त्यावेळीसुद्धा जॉकीने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. ही माहिती जॉकीचे वडील राजकुमार लोन्हारे यास समजताच मंगेशच्या घरी येऊन त्याने वाद घातला. 

शुक्रवारी दुपारीसुद्धा मंगेश आणि जॉकी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सायंकाळी ७ च्या सुमारास जॉकीच्या घरी जाऊन येतो, असे आई पुष्पाला सांगून तो घरून निघाला. जॉकीच्या घरी गेल्यानंतर पुन्हा त्यांच्यात वाद झाला असता जॉकी व राजकुमार यांनी मंगेशला काठीने मारहाण केली. या मारहाणीत मंगेश घटनास्थळीच मृत झाला. रात्री उशिरापर्यंत मंगेश घरी न आल्याने शनिवारी सकाळी ४ च्या सुमारास त्याची आई जॉकीच्या घरी गेली असता मंगेश रस्त्यावर मृतावस्थेत मिळून आला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून लोन्हारे पितापुत्राला अटक केली. 

मैत्रीने केला घात 
जॉकी आणि मंगेश हे दोघेही एकमेकांचे जिवलग मित्र होते. कामावर आणि दारू प्यायला सोबतच जात होते. त्यांच्या परिसरात त्यांची मैत्री चर्चित होती. मात्र, कुठल्यातरी कारणावरून त्यांचे संबंध ताणल्या गेले होते. सख्खे मित्र पक्‍के वैरी झाले होते. त्या वादातूनच हत्याकांड घडले.

Web Title: nagpur news murder crime

टॅग्स