‘माय सिटी, माय वॉल’ आज

‘माय सिटी, माय वॉल’ आज

नागपूर - रस्त्याच्या कडेला फुथपाटवरून चालताना नेहमीच शासकीय वा खासगी कार्यालयाच्या इमारती, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बस असाे की इतर संरक्षक भिंती; कुठेही नजर टाका, पान आणि खर्रा खाल्ल्यानंतरची लाळ थुंकलेली दिसते. शिवाय मूत्रविसर्जन करणाऱ्यांमुळे दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे अशा भिंती नकोशा वाटतात. ‘माय  सिटी, माय  वॉल’ या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी अशा भिंतीवर रंगांचे भावविश्‍व रेखाटण्यात येणार आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा महानगर, क्रेडाई यांच्या वतीने शुक्रवारी (ता. पाच) सकाळी आठ ते दुपारपर्यंत स्ट्रीट वॉल पेंटिंग स्पर्धा होत आहे. यात ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असून, सकाळी आठ ते दुपारी तीन यावेळेत आर्टिस्ट आणि विद्यार्थी बदलते शहर आणि विकास, महाराष्ट्राचा इतिहास, आपले सैन्य आणि पोलिस आदी विषयांवर भित्तिचित्रे रेखाटणार आहेत. क्रीडा चौक, हनुमाननगर आणि आंबेडकर कॉलेजसमोर दीक्षाभूमी येथील भिंतीवर ही स्पर्धा दोन गटांत सुरू होईल. पहिल्या गटात २५ पेक्षा अधिक वयोगटातील आर्टिस्ट, तर विद्यार्थी गटात १८ ते २५ वयोगटातील तरुण सहभागी होतील. एका गटात तीनजण असतील. परीक्षणानंतर सायंकाळी साडेचार वाजता संत रविदास सभागृह, विमा दवाखाना हनुमाननगर येथे बक्षीस वितरण होईल. या स्पर्धेसाठी क्रेडाई, सकाळ, महाराष्ट्र महिला अर्बन को-ऑप. सोसायटी, ॲविस फिटनेस  स्टुडिओ, सेंट्रल टाइम्स, विदर्भ मीडिया, ओम साई फोटो स्टुडिओ, खंगार कॅटरर्स, नगरसेवक संदीप गवई, भाजपचे देवेन दस्तुरे यांचे सहकार्य लाभले आहे. नोंदणीसाठी ९५९५८५३२६६, ८२३७९९९३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com