अधिकारी दौऱ्यावर,विभाग वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - दफ्तरदिरंगाई, लेटलतिफी आणि सरकारी कर्मचारी यांचे घनिष्ठ नाते बुधवारी (ता. ३१) जननमंचने केलेल्या पाहणीत पुन्हा एकदा सिद्ध झाले. जनमंचने जिल्हा परिषदेच्या कार्यालयात केलेल्या पाहणी दौऱ्यात अधिकारी दौऱ्यावर आणि विभाग वाऱ्यावर अशी स्थिती दिसून आली. मुख्य म्हणजे वेळेवर कार्यालयात उपस्थित न राहणे ही नित्याचीच बाब असल्याचे या पाहणीत आढळले.

सिव्हिल लाइन्स भागातील रविभवनाजवळील जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावरच अधिकाऱ्यांना भेटण्याची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ दिलेली आहे. मात्र, दहाचा काटा ओलांडून ११ वाजले तरी ना अधिकारी आपल्या कक्षात असतात ना बाबू त्यांच्या टेबलवर. जनमंचचे उपाध्यक्ष ॲड. मनोहर रडके यांच्या नेतृत्वात जनमंच टीमने सामान्य प्रशासन विभाग, लेखा विभाग, शिक्षण विभाग, लघुसिंचन विभाग, पंचायत विभाग, कृषी विभाग यांची पाहणी केली. जनमंचच्या चमूमध्ये खरसने पाटील, राम आखरे, राजेश किलोर, टी. बी. जगताप, व्ही. आर. जावळकर, अशोक कामडी, श्रीकांत दोंड, किशोर गुल्हाने, सुहास खांडेकर, उत्तम सुळक उपस्थित होते. 

सर्वच दौऱ्यावर कसे?
पाहणीदरम्यान सर्वच विभागाचे प्रमुख अधिकारी दौऱ्यावर वा मुंबईला बैठकीसाठी गेल्याचे उत्तर सांगण्यात आले. मात्र, एकाच दिवशी सर्वच अधिकारी बैठक वा दौऱ्यावर कसे काय असू शकतात? असा प्रश्‍न उपस्थित झाला. तसेच सर्व विभागप्रमुखांसह मुख्य कार्यकारी अधिकारी नागपुरात नसतील तर जिल्हा परिषदेचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. 

Web Title: nagpur news nagpur municipal corporation officer