अधिकाऱ्याचा बनावट ‘ट्रॅप’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - नागपूर पोलिस विभागातून सीबीआयमध्ये प्रतिनियुक्‍तीवर गेलेल्या एका पोलिस निरीक्षक आणि त्याच्या सात पोलिस कर्मचाऱ्यांनी एका बड्या अधिकाऱ्यावर बनावट सापळा रचून त्याला लाच घेताना अडकवल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सीबीआयचे तत्कालीन पोलिस अधिकारी प्रदीप लांडे, हवालदार जितेंद्र नाईकवाड, मेसर्स पेरीवर्ल्ड कॉम्प्युटरचे संचालक संजय सिन्हा, कर्मचारी शांतीलाल चैतराम पाटील, झेडएआरआरचे संचालक जुबेर अली, मेसर्स ऑनलाइन कॉम्प्युटर्सचे संचालक राजेश त्रिपाठी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

प्रदीप लांडे हे नागपुरातील सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होते. ३ सप्टेंबर २०१३ मध्ये केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे (सीबीडब्ल्यूई) तत्कालीन अतिरिक्‍त संचालक व्ही. आर. हनवते यांच्याविरुद्ध सापळा रचून एक लाख रुपयांची लाच घेताना अटक केल्याचा बनाव त्यांनी केला होता. हनवते यांनी सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयात या कारवाईविरुद्ध तक्रार केली होती. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी काही कंपन्यांशी हातमिळवणी करून बनावट ट्रॅप लावून फसविल्याचे हनवते यांनी तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीची शहानिशा दिल्ली सीबीआयने केली. सीबीडब्ल्यूई विभागात संगणक पुरवठा करणारे कंत्राटदार आणि माजी संचालकाविरुद्ध ३ मे २०१२ मध्ये सीबीआयमध्ये तक्रार दाखल केली होती. ही तक्रार प्रलंबित असताना प्रदीप लांडे यांनी काही संगणक कंपन्यांच्या संचालकांशी संगनमत करून सापळा रचला. 

लाच मागत असल्याचे दर्शवण्यासाठी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंगमध्ये छेडछाड करण्यात आली. दुसऱ्याच्या मोबाईलमधील एसडी कार्डद्वारे ते रेकॉर्डिंग प्राप्त करण्यात आले होते. पैशाची मागणी केली असताना शासकीय पंचसुद्धा घटनास्थळी उपस्थित नव्हते. साक्षीदारांना हनवते यांच्या कार्यालयाबाहेरच रोखण्यात आले होते. हनवते यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्याच्या नावातही बदल करण्यात आला. तसेच एफआयआरमध्ये त्याचा पत्ताही बनावट देण्यात आला. सर्व बाबी समोर आल्यानंतर दिल्ली सीबीआयचे निरीक्षक अवनीश कुमार यांनी प्रदीप लांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. लांडे हे सोनेगाव पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक पदावर रुजू होते. 

Web Title: nagpur news nagpur police