‘मिसिंग’ पथक म्हणजे पांढरा हत्ती!

अनिल कांबळे 
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - पोलिस ठाण्यात विविध पथके निर्माण करून कामकाज दाखवले जाते. मात्र, अनेक पथकांचे अस्तित्व केवळ कागदावरच राहते. यामध्ये प्रामुख्याने मिसिंग पथकाचा समावेश आहे. जोपर्यंत पोलिस ठाण्यातील अंतर्गत बदल्या होत नाहीत, तोपर्यंत ठाण्यातील कारभार योग्य चालणार नाही. त्यामुळे आयुक्‍तांनी बदल्यांसह अंतर्गत बदल्यांवरही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागपूर - पोलिस ठाण्यात विविध पथके निर्माण करून कामकाज दाखवले जाते. मात्र, अनेक पथकांचे अस्तित्व केवळ कागदावरच राहते. यामध्ये प्रामुख्याने मिसिंग पथकाचा समावेश आहे. जोपर्यंत पोलिस ठाण्यातील अंतर्गत बदल्या होत नाहीत, तोपर्यंत ठाण्यातील कारभार योग्य चालणार नाही. त्यामुळे आयुक्‍तांनी बदल्यांसह अंतर्गत बदल्यांवरही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहर पोलिस दलातील प्रत्येक पोलिस ठाण्यात मिसिंग पथक स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये चार ते सहा पोलिस कर्मचारी असतात. मात्र, ते सर्व कर्मचारी नावापुरतेच काम करतात. कुणी हरवले किंवा युवती पळून गेली तर केवळ मिसिंगची नोंद दाखल करण्यापलीकडे हे पथक कोणतेच काम करीत नाही. शहरात महिन्याच्या सरासरी १५० मिसिंग दाखल होतात. मात्र, त्यांचा शोध घेण्याचे काम असतानाही मिसिंग पथक केवळ गुन्हा दाखल करणे किंवा नोंद करून ठेवतो. जी व्यक्‍ती हरवली किंवा पळून गेली असेल तर त्याच्या नातेवाइकांना गुन्हे शाखेच्या चकरा माराव्या लागतात. मिसिंग पथक योग्य सहकार्य करीत नसल्यामुळे नातेवाइकांना मानसिक त्रास होतो. पथकातील कर्मचारी सहानुभूतीपूर्वक बोलतसुद्धा नाहीत. मोठ्या आशेने नातेवाईक विचारपूस करायला आल्यास त्यांना पोलिस ठाण्यात उलटसुलट उत्तरे दिली जातात. त्यामुळे मिसिंग पथकाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.    

अर्ज चौकशी विभाग
प्रत्येक पोलिस ठाण्यात महिनाभरात जवळपास १५० ते २०० पर्यंत अदखलपात्र गुन्हे (एनसी) नोंद होतात. ते निकाली निघणे आवश्‍यक असते. मात्र, आजच्या स्थितीत हजारोंवर एनसी अजून अर्ज चौकशी विभागाच्या दिरंगाईमुळे रखडलेल्या आहेत. केवळ मालदार आणि वजनदार तक्रारींवर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भर असतो. तसेच त्या एनसीची कुण्या अधिकाऱ्याने किंवा कर्मचाऱ्याने चौकशी करावी, हेसुद्धा ठरलेले असते. या विभागावर वरिष्ठांचाच वरदहस्त असल्यामुळे हा विभाग सुधारणे कठीण आहे. तरीही आयुक्‍त उपायुक्‍तांनी ‘पेंडिग्स एनसी’कडे लक्ष दिल्यास कामात तत्परता येऊ शकते.

महिला व बालपथक
पोलिस ठाण्यातील ‘शून्य’ किंमत असलेले पथक म्हणून महिला व बालपथकाची ओळख आहे. या पथकाची केवळ कागदावरच नोंद असते. महिला किंवा बालकांविषयक गुन्ह्यांची दखल या पथकातील महिला कर्मचाऱ्याने घ्यायला हवी. मात्र, अनेक महिला अधिकारी व कर्मचारी या पथकाबाबत अनभिज्ञच राहतात. केवळ सही करण्यापुरते या पथकाची स्थापना केल्याची चर्चा ठाण्यात असते.

Web Title: nagpur news nagpur police station