‘सकाळ’च्या वर्धापनदिनी रंगणार हृषिकेशची मैफल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

नागपूर -  दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त येत्या १० मार्च रोजी नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. ख्यातनाम गायक हृषिकेश रानडे यांची सुरेल मैफल या प्रसंगी रंगणार असून, सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. विकास आमटे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. 

१० मार्च २०१८ रोजी सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. ‘सकाळ’ची विदर्भ आवृत्ती १५ वर्षांची वाचकसेवा पूर्ण करून १६ व्या वर्षात प्रवेश करीत आहे. त्यानिमित्त तरुण उद्योजकांसह शिक्षण, आरोग्य, गायन, तंत्रज्ञान, क्रीडा, ज्येष्ठांची सेवा, ग्रामोत्थान, अर्थकारण, कौशल्य विकास इत्यादी क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जाणार आहे. आपल्या सुरेल आवाजाने महाराष्ट्राला वेड लावणारा तरुण गायक हृषिकेश रानडे हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आहे. सारेगामा फेम हृषिकेश रानडे याने हिंदी-मराठीसह आणखी काही भाषांमध्ये गाणी गायिली आहेत. श्रेया घोषाल या विख्यात गायिकेसह तसेच अनेक ख्यातिप्राप्त कलावंतांसोबत हृषिकेशने अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला आहे. ‘सकाळ’च्या वर्धापनदिनानिमित्त त्याचा ‘लाइव्ह कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आला असून, नागपूरकरांसाठी हा कार्यक्रम मेजवानी ठरणार आहे.

Web Title: nagpur news nagpur Sakal anniversary Hrishikesh Ranade