नागपूर, पुण्यासारखी सांस्कृतिक राजधानी व्हावी - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नागपूर - नागपूरने नेहमीच इतिहास जतन करण्याचा प्रयत्न केला. चांगले रस्ते, चांगले  पूल, चांगल्या शैक्षणिक सोयी आहेत. आता भविष्यात नागपूरची पुण्यासारखीच राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख होण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. 

नागपूर - नागपूरने नेहमीच इतिहास जतन करण्याचा प्रयत्न केला. चांगले रस्ते, चांगले  पूल, चांगल्या शैक्षणिक सोयी आहेत. आता भविष्यात नागपूरची पुण्यासारखीच राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख होण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे सांगितले. 

शिवाजीनगरातील शिवाजी उद्यानात नागपूर महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे रिमोटची कळ दाबून त्यांनी अनावरण केले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, उपमहापौर दीपराज पार्डीकर, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, आमदार सुधाकर कोहळे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार प्रा. अनिल सोले, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, बच्चू मुंडले, शिवाजीनगर नागरिक मंडळाचे निखिल मुंडले उपस्थित होते. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी इतिहासाचे जतन करणाऱ्या महापालिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, महानगरपालिका खऱ्या अर्थाने शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे. विवेकानंद स्मारक, नामांतर लढ्यातील शहिदांचे स्मारक, कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूरसाठी सांस्कृतिक वैभव ठरत आहेत. 

आता नागपुरात राष्ट्रीय स्तरावर कुठलीही कॉन्फरन्स होऊ शकेल अशा सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच नागपूरचा सांस्कृतिक राजधानी म्हणून उदय होईल, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बांबू वाचनालयात रमेश सातपुते यांनी लावलेल्या चित्रप्रदर्शनाचे उद्‌घाटन केले.

तसेच त्यांच्यासह मूर्तिकार संजय गारजलवार आणि शाखा अभियंता शिरीष तारे यांचा सत्कार केला. प्रास्ताविक सभापती संजय बंगाले यांनी केले.

आभार नगरसेवक सुनील हिरणवार यांनी मानले. कार्यक्रमात महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, नगरसेवक निशांत गांधी, किशोर जिचकार, जगदीश ग्वालबंशी, माजी आमदार डॉ. मधुकर वासनिक, माजी आमदार यादवराव देवगडे, महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. राजाभाऊ शिलेदार, जयप्रकाश गुप्ता, रवी अग्रवाल, रमेश मंत्री, कपिल चांडक, अनिल हस्तक, मीनाताई जोशी, गणेश कुल्हार, श्रीकांत देशपांडे, प्रदीप डहाके, सुरेश कुळकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: nagpur news Nagpur should be the cultural capital of Pune