शेतकरी, शहिदांच्या पाल्यांना शुल्क माफ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्य आणि शहीद होणाऱ्या जवानांच्या पाल्यांना विद्यापीठातील विभाग आणि तीन संलग्नित महाविद्यालयात सर्वच प्रकारचे शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याची माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. तसा प्रस्ताव नियमित व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्य करण्यात आल्याचे कुलगुरूंनी सांगितले. 

काही दिवसांआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने अशी मागणी विद्यापीठाकडे करण्यात आली होती. यासाठी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देण्यात आले होते. यावर कुलगुरूंनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. विद्यापीठामध्ये विदर्भाच्या विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही विदर्भामध्येही अधिक आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करता विद्यापीठाने त्यांचे प्रवेश, परीक्षा आणि इतर सर्व शुल्क माफ करावे अशी मागणी संघटनेने केली होती. यावर कुलगुरूंनी सकारात्मकता दाखविली. त्यानुसार गुरुवारी विद्यापीठात झालेल्या नियमित व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाली. या वेळी त्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठातील विविध विभाग आणि तीन महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा आणि शिक्षण शुल्क माफ करण्यात येईल. मात्र, संलग्नित महाविद्यालयांच्या प्रवेश शुल्काचे अधिकार हे महाविद्यालयांकडे असल्यामुळे विद्यापीठ त्यामध्ये हस्तक्षेप करणार नसल्याने या महाविद्यालयांमध्ये पाल्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. 

Web Title: nagpur news nagpur university