उत्तरपत्रिका तपासणीत विद्यापीठ तोंडघशी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

नागपूर - मुंबई विद्यापीठातील वाणिज्य अभ्यासक्रमाच्या दोन लाख उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मदतीचा हात दिला होता. आठ दिवसांत दोन लाख उत्तरपत्रिका तपासण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले. मात्र, 33 दिवस लोटूनही केवळ 15 हजार उत्तरपत्रिका तपासण्यात आल्या. या प्रकाराने मदतीचा हात देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तोंडघशी पडल्याचे दिसून येते. 

मुंबई विद्यापीठात निकाल वेळेवर लागत नसल्याची ओरड विद्यार्थ्यांकडून होत आहे. या प्रकरणाची दखल राज्यपाल कार्यालयाने घेतली. त्यातूनच कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना खडसावत 31 जुलैच्या आत सर्वच निकाल लावण्याचा अल्टिमेटम दिला. यासंदर्भात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची डॉ. देशमुख यांच्यासोबत दिल्लीत चर्चा झाली. त्यात नागपूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जलद तपासण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती गठित करण्यात आली. या समितीने वाणिज्य विषयातील 250 प्राध्यापकांद्वारे मूल्यांकन करण्याचे ठरविले. त्यासाठी धनवटे नॅशनल कॉलेजमधील अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळेचा वापर करण्याचा निर्णय झाला. 24 जुलैपासून मूल्यांकनास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यासाठी महाविद्यालयात अडीचशे संगणकांची प्रयोगशाळाही उपलब्ध करून दिली. मात्र, मुंबईसह इतर ठिकाणीही उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू असल्याने "सर्व्हर' "स्लो' झाल्याचे दिसून आले. या प्रकाराने आतापर्यंत केवळ पंधरा हजार उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली. 

सांगतात अडीचशे, प्रत्यक्षात 50 
मूल्यांकनासाठी अडीचशे प्राध्यापक तयार असल्याचे सांगत असताना, प्रत्यक्षात 50 प्राध्यापक मूल्यांकनासाठी नियमित येतात. हे प्राध्यापक मूल्यांकनासाठी अपुरेच पडत असून, वारंवार येणाऱ्या सुट्यांमुळे मूल्यांकनास प्राध्यापक गैरहजर राहतात. या प्रकाराने एकीकडे विद्यापीठातील ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे झटपट निकाल देणाऱ्या नागपूर विद्यापीठाचे नाव बदनाम झाल्याचे दिसून येते. मदतीचा हात देण्याचा प्रकार विद्यापीठाचा अंगलट आल्याचे दिसून येते. 

Web Title: nagpur news nagpur university